मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Air Force : महिला वैमानिक ठेवणार भारत चीन सीमेवर लक्ष; सुखोईतून उड्डाण घेत चीनला दिला इशारा

Indian Air Force : महिला वैमानिक ठेवणार भारत चीन सीमेवर लक्ष; सुखोईतून उड्डाण घेत चीनला दिला इशारा

Sep 28, 2022, 09:24 AM IST

    • Women Pilots In Indian Air Force : सध्या संपूर्ण देशात स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. या उत्सवात भारतीय हवाई दलातील महिला वैमानिकांनी चीन सीमेवर सुखोई या आधुनिक विमानातून उड्डाण घेत भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम असून चीनला देखील सूचक इशारा दिला आहे.
उड्डाणासाठी सज्ज असलेल्या महिला वैमानिक

Women Pilots In Indian Air Force : सध्या संपूर्ण देशात स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. या उत्सवात भारतीय हवाई दलातील महिला वैमानिकांनी चीन सीमेवर सुखोई या आधुनिक विमानातून उड्डाण घेत भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम असून चीनला देखील सूचक इशारा दिला आहे.

    • Women Pilots In Indian Air Force : सध्या संपूर्ण देशात स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. या उत्सवात भारतीय हवाई दलातील महिला वैमानिकांनी चीन सीमेवर सुखोई या आधुनिक विमानातून उड्डाण घेत भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम असून चीनला देखील सूचक इशारा दिला आहे.

तेजपुर : काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलातील महिला वैमानिकांनी डोरनियर विमानातून उड्डाण घेत भारतीय समुद्र सीमावर लक्ष ठेवणारी टेहळणी मोहीम राबविली होती. आता, भारतीय हवाई दलातील महिला वैमानिकांनी तेजपुर येथील हवाई तळावरून सुखोई ३० या आधुनिक लढाऊ विमानातून उड्डाण घेत अरुणाचल प्रदेश, आसाम येथील भारत चीन सीमेवर टेहळणी केली आहे. काही कुघोडी केल्यास उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत असा सूचक इशारा देखील या महिला वैमानिकांनी दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

भारतीय सशस्त्र दलात मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी आज पुरुष अधिकाकाऱ्यांप्रमाणे कार्य करत आहेत. नौदलात आणि हवाई दलात अत्यधिनिक विमाने चालवून या महिला देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत. सध्या संपूर्ण देशात स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला या आघाडीवर आहेत. भारतीय हवाई दलात देखील १४०० हून अधिक महिला अधिकारी आज कार्यरत आहेत. त्या ग्राउंड ड्यूटी तसेच एयर ट्राफिक कंट्रोल विभाग, शस्त्रास्त्र प्रणाली विभाग येथे कार्यरत असून देश संरक्षणात मोलाची भूमिका बजावत आहे. या सोबत अत्याधुनिक लढाऊ विमाने देखील आता महिला वैमानिक चालवत आहेत. यातून आम्ही देशाच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज असल्याच्या संदेश त्या देत आहेत.

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. सीमेवर आजही तणाव पूर्ण शांतता आहे. चीनी विमाने भारतीय हद्दीत घुसून त्यांचे भंग करत असतो. अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात आहेत. तसेच हवाई दल देखील आकाशातून भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहे. आसाम येथील तेजपुर हा महत्वाचा भारतीय हवाई दलाचा तळ असून येथून चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. याच विमानतळावरून मंगळवारी तीन महिला वैमानिकांनी लढाऊ सुखोई ३० या आधुनिक विमानातून उड्डाण घेत चीनला आपली ताकद दाखवून दिली आहे.

 

एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर महिला वैमानिकांच्या उड्डाणाचे फोटो ट्विट केले आहे. यात महिला वैमानिक या हेलिकॉप्टर आणि सुखोई विमानातून भरारी घेत असतांना दिसत आहेत. फ्लाईट लेफ्टनंट तेजस्वी देशातील एकमेव महिला वैमानिक आहे, ज्या सुखोई विमानाच्या शस्त्र प्रणालीचे पायलटिंग म्हणजेच वेपन सिस्टीम ऑपरेटींग करण्यात सक्षम आहे. एएनआयशी बोलतांना त्या म्हणाल्या, आज देशात अनेक क्षेत्रात स्त्रिया या आघाडीवर आहेत. आज हवाई दलातही महिला पुढे आहेत. त्या आधुनिक विमानांचे उड्डाण करून देशाचे संरक्षण करत आहेत. आज कोणत्याही परिस्थितीला सोमोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तसेच चोख उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत असे देखील त्या म्हणाल्या.

 

विभाग

पुढील बातम्या