मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Crime: चोरीच्या संशयावरून महिलेला निर्वस्त्र करत मारहाण! महिलेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Delhi Crime: चोरीच्या संशयावरून महिलेला निर्वस्त्र करत मारहाण! महिलेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Aug 15, 2022, 11:03 AM IST

    • दक्षिण दिल्लीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयावरून घरकामात मदत करणाऱ्या एका महिलेला निर्वस्त्र करत घर मालकिणीने जबर मारहाण केली. या सोबतच २४ तास तिला डांबून ठेवले. या नंतर त्रस्त झालेल्या या पिडीत महिलेलेने अपमान सहन न झाल्याने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Delhi Crime

दक्षिण दिल्लीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयावरून घरकामात मदत करणाऱ्या एका महिलेला निर्वस्त्र करत घर मालकिणीने जबर मारहाण केली. या सोबतच २४ तास तिला डांबून ठेवले. या नंतर त्रस्त झालेल्या या पिडीत महिलेलेने अपमान सहन न झाल्याने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

    • दक्षिण दिल्लीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयावरून घरकामात मदत करणाऱ्या एका महिलेला निर्वस्त्र करत घर मालकिणीने जबर मारहाण केली. या सोबतच २४ तास तिला डांबून ठेवले. या नंतर त्रस्त झालेल्या या पिडीत महिलेलेने अपमान सहन न झाल्याने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दिल्ली : दक्षिण दिल्ली मध्ये एका घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी मांत्रिकाला बोलावण्यात आले. यानंतर घर काम करणाऱ्या एका महिलेला दोषी ठरवत संबंधित महिलेला निर्वस्त्र करत तिला बांधून मारहाण करण्यात आल्याची धक्कादाक घटना घडली आहे. हा अपमान सहन न झाल्याने पीडित महिलेने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, पोलिसांनी किरकोळ कलमे लावत गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप पीडितेच्या घरच्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसर ४३ वर्षीय पीडित महिला ही तिच्या परिवारासोबत अंसल विला, सतबारी येथे एका खोलीत राहते. त्या गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी घर काम करतात. त्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी १० महिन्यापूर्वी चोरी झाली होती. ९ ऑगस्ट रोजी या महिलेने एका मांत्रिकाला बोलवत चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. अघोरी विद्येचा वापर करून मांत्रिकाने चोरचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी मांत्रिकाने घर मालकिनीला तांदूळ आणि चुना देत घरात काम करणाऱ्या कामगारांना खाण्यास दिला. मांत्रिकाने म्हटले की, हे खाऊन ज्याचे तोंड लाल होईल तोच चोर असेल. घर काम करणाऱ्या एका महिलेचे तोंड लाल झाल्याने घर मालकिनीने त्या महिलेला घरात डांबून ठेवत मारहाण केली.

पीडितेला अपमान सहन न झाल्याने विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

मांत्रिकाने दिलेले तांदूळ खाल्ल्यावर महिलेचे तोंड लाल झाले. या नंतर घर मालकिणीने या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचे कपडे काढून तिला एका खोलीत कोंडण्यात आले. जवळपास २४ तास तिला या खोलीत कोंडून ठेवण्यात आले. तसेच तिला बांधून मारहाणही करण्यात आली. या नंतर दुसऱ्या दिवशी पिडीनेते पोलिस ठाणे गाठत तिच्यावर बितलेला प्रसंग कथन केला. पीडित महिलेने टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने कपडे मागितले. या ठिकाणी तिने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. या नंतर तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. ती शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी तिने दिलेल्या माहितीनुसार ११ ऑगस्टला गुन्हा दाखल केला.

विभाग

पुढील बातम्या