मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं खास फिचर, वापरकर्त्यांना थेट सेलिब्रिटींशी बोलता येणार!

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं खास फिचर, वापरकर्त्यांना थेट सेलिब्रिटींशी बोलता येणार!

Sep 14, 2023, 01:53 PM IST

    • WhatsApp Channels Launched: व्हॉट्सअपने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणले आहे.
Whatsapp (PTI)

WhatsApp Channels Launched: व्हॉट्सअपने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणले आहे.

    • WhatsApp Channels Launched: व्हॉट्सअपने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणले आहे.

WhatsApp New Features: इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणले आहे. कंपनीने व्हॉट्सअप चॅनलमध्ये डायरेक्टरी सर्च सुविधेचा समावेश केला आहे. या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटर्स, बिझनेस आणि सेलिब्रिटींद्वारा तयार करण्यात आलेले चॅनल शोधता येणार आहे. एवढेच नाही तर वापरकर्त्यांना क्रिएटर्सच्या मेसेजवर रिअ‍ॅक्ट होण्याची सुविधा मिळणार आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

भारतासह 150 देशांमधील वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअप चॅनेल फिचर सुरू होत असल्याचे कंपनीने बुधवारी सांगितले. येत्या आठवड्यापासून सर्व वापरकर्त्यांना या फीचरचा आनंद लुटता येणार आहे. व्हॉट्सअपचे सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या चॅनलवर याची घोषणा केली. यापूर्वी इन्स्टाग्रामने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणले होते. आता व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनाही या फीचर्सचा लाभ घेता येणार आहे.

व्हॉट्सअॅप चॅनेलमध्ये वॅलिड इनवाइट लिंक असलेले वापरकर्ते सामील होऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, वापरकर्त्याची गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी अॅप चॅनेल तयार करणाऱ्या वापरकर्त्यांच्या फोन नंबरची माहिती गुपीत ठेवली जाणार.

२०० रुपयांच्या तिकीटात सरकार आणि थिएटर मालकांना किती पैसे मिळतात? समजून घ्या गणित

कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे पाठवलेले संदेश केवळ ३० दिवसांसाठी दिसतील. तसेच, चॅनल सदस्य शेअर केलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ शकतात, वापरकर्ते या मॅसेजला रिप्लाय देऊ शकणार नाहीत. चॅनेलमध्ये प्रसारित केलेले संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्शनसह सुरक्षित केले जातील. व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे की यूजर्सचे डायरेक्ट मेसेज, ग्रुप चॅट्स, कॉल्स, स्टेटस मेसेज आणि अॅटॅचमेंट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केले जातील.

विभाग

पुढील बातम्या