मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vladimir Putin: हे आमच्या सरकारचं अपयश...; रशियावर उद्भवलं नवं संकट, पुतिन यांनी मागितली जनतेची माफी

Vladimir Putin: हे आमच्या सरकारचं अपयश...; रशियावर उद्भवलं नवं संकट, पुतिन यांनी मागितली जनतेची माफी

Dec 16, 2023, 06:30 AM IST

    • Russia Economic crisis: यु्क्रेन विरुद्ध युद्धात रशियाची मोठी वित्तहानी आणि जीवितहानीही झाल्याचे बोलले जात आहे.
Vladimir Putin (via REUTERS)

Russia Economic crisis: यु्क्रेन विरुद्ध युद्धात रशियाची मोठी वित्तहानी आणि जीवितहानीही झाल्याचे बोलले जात आहे.

    • Russia Economic crisis: यु्क्रेन विरुद्ध युद्धात रशियाची मोठी वित्तहानी आणि जीवितहानीही झाल्याचे बोलले जात आहे.

Vladimir Putin On Russia inflation: रशिया आणि युक्रेनच्या युद्धानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह संपूर्ण देशाला नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पुतिन यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी रशियामध्ये वाढलेल्या महागाईबाबत विशेषतः अंड्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याबद्दल देशाची माफी मागितली आहे. महागाई वाढल्याबाबत मी माफी मागतो, हे आमच्या सरकारचे अपयश आहे, असेही त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

रशियाने युक्रेनविरोधात २४ फेब्रुवारी २०२२ साली युद्ध पुकारले होते. या युद्धाला जवळपास दोन वर्ष होत आली असून त्याचा रशियावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. देशावर आर्थिक संकट कोसळले असून अंड्याच्या किमतीत चक्क ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. त्याचा परिणामही स्पष्टपणे दिसून येतो. रशियामध्ये महागाई झपाट्याने वाढली आहे. नुकताच पुतिन यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यावेळी इरिना अकोपोवा या वृद्ध महिलेने पुतिन यांना वाढत्या महागाई आणि अंड्याच्या गगनाला भिडलेल्या किंमतीबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर पुतिन यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

पुतिन म्हणाले की, "देशात अंड्याची मागणी वाढली आहे. त्यावर उपाय शोधण्यात आमचे सरकार कमी पडले. आगामी काळात योग्य ती पावले उचलली जातील. यासाठी २०२४ च्या सुरुवातीच्या सहा महिन्यात १.२ अब्ज अंडी आयात करण्यात येणार असून त्यावर कर लावला जाणार नाही", असे अश्वासन त्यांनी दिले.

रशियाची सांख्यिकी संस्था रोसस्टाटच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये अंड्यांच्या किमतीमध्ये १३ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये अंड्याच्या किंमतीत आणखी १५ टक्क्यांनी वाढ झाली. नागरिकांना एक डझन अंडी घेण्यासाठी १३० रुबल्स (भारतीय चलनानुसार, जवळपास १२० रुपये) मोजावे लागत आहेत. युद्धविरोधात सुरू होण्यापूर्वी रशियात एक डझन अंडी १०० रुपयांनी खेरदी केली जात होती.

पुढील बातम्या