मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur Violence : मणिपूरमध्ये ७ महिन्यानंतर इंटरनेट सुरू होताच पुन्हा उफाळला हिंसाचार, १३ जणांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपूरमध्ये ७ महिन्यानंतर इंटरनेट सुरू होताच पुन्हा उफाळला हिंसाचार, १३ जणांचा मृत्यू

Dec 04, 2023, 05:37 PM IST

  • Manipur Violence Flares Up Again : मणिपूरमध्ये सात महिन्यानंतर इंटरनेटसेवा पूर्ववत सुरू होताच दोन गटामध्ये हिंसाचार पुन्हा उफाळला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Manipur Violence Flares Up Again

Manipur Violence Flares Up Again : मणिपूरमध्ये सात महिन्यानंतर इंटरनेटसेवा पूर्ववत सुरू होताच दोन गटामध्ये हिंसाचार पुन्हा उफाळला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Manipur Violence Flares Up Again : मणिपूरमध्ये सात महिन्यानंतर इंटरनेटसेवा पूर्ववत सुरू होताच दोन गटामध्ये हिंसाचार पुन्हा उफाळला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मणिपूरमध्ये सोमवारी दुपारी झालेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनेत कमीत कमी १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी दुपारच्या सुमारास टेंगनौपाल जिल्ह्यातील सायबोलजवळ लेटिथु गावात दोन गटात जोरदार गोळीबार झाला. मणिपूरमधील हिंसा प्रभावित क्षेत्रात गेल्या सात महिन्यापासून इंटरनेट सेवा बंद होती. सरकारने रविवारी इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करताच राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसा भडकलेल्या ठिकाणापासून सुरक्षा दल जवळपास १० किलोमीटर दूर होते. सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर लीथू गावात १३ मृतदेह आढळले. मृतदेहांजवळ कोणतेही शस्त्रे मिळाली नाहीत. असे वाटते की, मृत व्यक्ती लीथु भागातील नसून इतर कोणत्या तरी क्षेत्रातील आहेत. पोलीस व सुरक्षा दलांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

कधी सुरू झाला संघर्ष?

मणिपूरमध्ये ३ मे रोजी मैतेई आणि कुकी समुदायादरम्यान हिंसाचार भडकला होता. या संघर्षात  कमीत कमी १८२ लोक मारले गेले होते तर जवळपास ५० हजार लोक बेघर झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये ३ मे पासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ही बंदी २३ सप्टेंबर रोजी काही वेळासाठी बंदी हटवली मात्र २६ सप्टेंबर रोजी पुन्हा इंटरनेट बंद करण्यात आले.

किती आहे लोकसंख्या ?

मणिपूरमध्ये मैतेई समुदायाची लोकसंख्या ५३ टक्के आहे व ते इंफाळ खोऱ्यात राहतात. तसेच  नगा आणि कुकी आदिवासींची लोकसंख्या जवळपास ४० टक्के आहे व ते डोंगराळ भागातील जिल्ह्यात राहतात.

विभाग

पुढील बातम्या