मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat : एकाच दिवशी देशाला ५ ‘वंदे भारत’ची गिफ्ट! महाराष्ट्रासाठी PM चौथ्या सुपर फास्ट ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

Vande Bharat : एकाच दिवशी देशाला ५ ‘वंदे भारत’ची गिफ्ट! महाराष्ट्रासाठी PM चौथ्या सुपर फास्ट ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

Jun 14, 2023, 09:29 PM IST

  • Vande bharat Indian :पहिल्यांदाच एकाच वेळी ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पाच वंदे भारत ट्रेन्सचे मार्ग व उद्घाटनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

Vande bharat

Vande bharat Indian :पहिल्यांदाच एकाच वेळी५वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पाच वंदे भारत ट्रेन्सचे मार्ग व उद्घाटनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

  • Vande bharat Indian :पहिल्यांदाच एकाच वेळी ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पाच वंदे भारत ट्रेन्सचे मार्ग व उद्घाटनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

Vande Bharat Trains : भारतीय रेल्वे देशाला आणखी पाच वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एकाच वेळी ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पाच वंदे भारत ट्रेन्सचे मार्ग व उद्घाटनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसला घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २६ जून रोजी ५ एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मोदी प्रत्यक्षात एका जागी उपस्थित राहून अन्य ४ जागांवरील ट्रेन्सला व्हर्ल्यूअल माध्यमातून झेंडा दाखवणार आहेत. या ५ वंदे भारत ट्रेन्सपैकी एक ट्रेन महाराष्ट्रात धावणार आहे. महाराष्ट्राला मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन ठरणार आहे. यापूर्वी दोन पूर्णपणे महाराष्ट्रात धावणाऱ्या तर एक महाराष्ट्रातून परराज्यात वंदे भारत धावते.

मुंबई-गोवा वंदे भारत ही महाराष्ट्रातील चौथी वंदे भारत ट्रेन ठरणार आहे. यापूर्वी २ पूर्णपणे राज्यातील शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत सुरु झाल्या आहेत. तर एक वंदे भारत ट्रेन बिलासपूरवरुन महाराष्ट्रातील नागपूर दरम्यान धावते. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचं उदघाटन ३ जून रोजी होणार होतं. मात्र ओडिशामधील ट्रेन अपघातानंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

भारतीय रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ ते इंदूर, भोपाळ ते जबलपूर, पाटणा ते रांची, बेंगळुरु ते हुबळी आणि गोवा ते मुंबई या ५ मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावणार आहेत. सध्या भारतामध्ये १८ वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत.

 

नव्याने सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेन्समुळे पहिल्यांदाच३राज्यांना वंदे भारतची भेट मिळणार हे.२६जूनपासून पहिल्यांदाच गोवा,झारखंड आणि बिहारला वंदे भारतची गिफ्ट मिळणार आहे.

पुढील बातम्या