मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live In Relationship : विवाहित महिलांना बॉयफ्रेंडसोबत राहण्यास परवानगी, उत्तराखंड हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Live In Relationship : विवाहित महिलांना बॉयफ्रेंडसोबत राहण्यास परवानगी, उत्तराखंड हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Jun 20, 2023, 02:29 PM IST

    • Live In Relationship Judgments : लिव्ह-इन रिलेशनशिपवरून देशभरात वाद पेटलेला असतानाच आता हायकोर्टाने यावर मोठा निकाल दिला आहे.
Uttarakhand High Court Judgment On Live In Relationship (HT)

Live In Relationship Judgments : लिव्ह-इन रिलेशनशिपवरून देशभरात वाद पेटलेला असतानाच आता हायकोर्टाने यावर मोठा निकाल दिला आहे.

    • Live In Relationship Judgments : लिव्ह-इन रिलेशनशिपवरून देशभरात वाद पेटलेला असतानाच आता हायकोर्टाने यावर मोठा निकाल दिला आहे.

Uttarakhand High Court Judgment On Live In Relationship : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लिव्ह-इन रिलेशनशिपवरून वाद पेटलेला असतानाच आता उत्तराखंड हायकोर्टाने नेमक्या याच प्रकरणावर ऐतिहासिक निकाल दिला आहे. कौटुंबिक कलहाच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना हायकोर्टाने महिलांना लग्न झाल्यानंतरही परपुररुषांसोबत राहण्यास परवानगी देण्याचा मोठा निकाल दिला आहे. विवाहित महिलेची इच्छा असेल आणि ती प्रियकरासोबत राहत असेल तर त्यावर कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, असं उत्तराखंडमधील उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळं आता विवाह झालेल्या पुरुष तसेच महिलांनाही आवडत्या व्यक्तींसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याची कायदेशीर परवानगी मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

Viral News : पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवत होता १७ वर्षीय रॅपर, गोळी झाडली गेल्याने अचानक मृत्यू

Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

पत्नी माहेरून परत आली नसल्याच्या कारणाविरोधात पतीने थेट हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना जस्टिस मनोज कुमार तिवारी आणि जस्टिस पंकज पुरोहित यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटलं की, महिला तिच्या प्रियकरासोबत तिच्या मर्जीने राहत आहे. त्यामुळं तिच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं योग्य नाही. महिलेने पतीकडे येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात हस्तक्षेप केला जाणार नसल्याचं सांगत हायकोर्टाने प्रतिवादी पतीच्या सर्व याचिका फेटाळून लावत विवाहित महिलेला मोठा दिलासा दिला आहे. यावेळी कोर्टाने महिलेला कोर्टरुममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

कोर्टात उपस्थित असलेल्या महिलेने न्यायमूर्तींसमोर बोलताना म्हटलं की, माझा पती चांगला वागत नाही, तो सातत्याने माझ्याशी दुर्व्यवहार करत असल्यानेच मी माझ्या प्रियकरासोबत माझ्या मर्जीने राहण्याचा निर्णय घेतला. याशिवाय पतीने कोर्टात केलेले सर्व आरोप महिलेने फेटाळून लावले आहे. दिल्लीतील आफताब पुनावाला आणि मुंबईतील मनोज साने प्रकरणानंतर देशभरात लिव्ह इन-रिलेशनशिपवर जोरदार चर्चा सुरू झाली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आता उत्तराखंड हायकोर्टाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या विवाहित जोडप्यांना मोठा दिलासा देणारा निकाल दिला आहे.

पुढील बातम्या