मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttar Pradesh: १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेचं जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं? तुम्हीच वाचा

Uttar Pradesh: १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेचं जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं? तुम्हीच वाचा

Jan 18, 2023, 02:14 PM IST

  • उत्तर प्रदेशच्या नोएडात शिक्षिका १६ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Teacher

उत्तर प्रदेशच्या नोएडात शिक्षिका १६ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

  • उत्तर प्रदेशच्या नोएडात शिक्षिका १६ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Noida: शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते गुरू-शिष्याचेच असते. परंतु, यूपीच्या नोएडामध्ये एक शिक्षिका तिच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की, ती त्याला घेऊन पळून गेली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधित तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील चौकशीला तपासाला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडाच्या सेक्टर १२३ मध्ये २२ वर्षीय शिक्षिका घरी मुलांचे ट्यूशन घेते. शिक्षिकेच्या घरासमोर १६ वर्षांचा एक मुलगा राहतो, जो ट्यूशन घेण्यासाठी तिच्याकडे येत असे. यादरम्यान, दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर रविवारी दोघेही घरातून पळून गेले.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की, रविवारी त्यांचा मुलगा दीडच्या सुमारास मावशीच्या घरी जात असल्याचे सांगत घरातून बाहेर पडला. मात्र, रात्री तो घरी परतलाच नाही. घरासमोर राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने आपल्याला मुलाला फूस लावून पळून नेल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यक्तीचा मुलगा तरूणीकडे शिकायला जात असे. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच दोघांचाही शोध घेतला जाईल.

विभाग

पुढील बातम्या