मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Yogi Adityanath : मुलींची छेड काढाल तर लक्षात ठेवा पुढं यमराज वाट पाहतोय; योगींचा रोडरोमियोंना थेट इशारा

Yogi Adityanath : मुलींची छेड काढाल तर लक्षात ठेवा पुढं यमराज वाट पाहतोय; योगींचा रोडरोमियोंना थेट इशारा

Sep 19, 2023, 04:38 PM IST

  • yogi Adityanath : ओढणी खेचल्याने सायकलवरून एक विद्यार्थिनी रस्त्यावर पडली होती. त्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीखाली चिरडून तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी रोडरोमियोंना इशारा दिला आहे.

Yogi Adityanath

yogi Adityanath : ओढणी खेचल्याने सायकलवरूनएक विद्यार्थिनी रस्त्यावर पडली होती. त्यानंतर मागून येणाऱ्यादुचाकीखाली चिरडून तिचामृत्यू झाला होता. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी रोडरोमियोंना इशारा दिला आहे.

  • yogi Adityanath : ओढणी खेचल्याने सायकलवरून एक विद्यार्थिनी रस्त्यावर पडली होती. त्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीखाली चिरडून तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी रोडरोमियोंना इशारा दिला आहे.

जर कोणी मुली व महिलांची छेड काढली तर त्यांनी लक्षात ठेवावे की, त्यांची वाट यमराज पहात आहे. त्याला यमराजकडे पाठवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आम्हाला सुरक्षेचे कडक उपाय करायला हवेत, असा कडक इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोडरोमियोंना दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

उत्तरप्रदेशमधील आंबेडकरनगर एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली होती. ओढणी खेचल्याने सायकलवरून एक विद्यार्थिनी रस्त्यावर पडली होती. त्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीखाली चिरडून तिचा मृत्यू झाला होता. हीरापूर बाजारात १५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. येथे तीन आरोपींनी एका मुलीची छेड काढली. विद्यार्थिनी शाळेतून सायकलवरून घरी जात होती. धावत्या सायकलवर बसलेल्या मुलीची ओढणी त्या तिघा आरोपींनी खेचली. त्यामुळे ती रस्त्यावर पडली. पाठीमागून येणाऱ्या दुचाकीच्या चाकाखाली आल्याने जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. १७ सप्टेंबरला त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तिघांनी पोलीस कर्मचाऱ्याकडून रायफल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन आरोपींच्या पायात गोळी लागली होती. तर पळून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तिसऱ्या आरोपीचा पाय मोडला होता.

या घटनेनंतर मुख्यमंत्री योगींनी रोडरोमिओंना इशारा दिला आहे. गोरखपूरच्या मानसरोवरमधील रामलीला मैदानात ३४३ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, कायदा सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आहे. कायदा मोडण्याचा कुणालाही अधिकार नाही. रस्त्यावरून जाताना कुणी मुलींची छेड काढल्यास त्यांना यमसदनी पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

पुढील बातम्या