मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग झालं? पाहा संपूर्ण यादी

Union Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग झालं? पाहा संपूर्ण यादी

Feb 01, 2023, 07:28 PM IST

  • cheaper and expensive list after Union Budget 2023: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग होतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Union Budget 2023

cheaper and expensive list after Union Budget 2023: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग होतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • cheaper and expensive list after Union Budget 2023: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग होतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केले. २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. दरम्यान, महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामन्यांची नजर काय स्वस्त आणि काय महाग होणार? याकडे लागली होती. या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. तर, कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत? तर कोणत्या वस्तू महागल्या आहेत? यावर एक नजर टाकूयात.

ट्रेंडिंग न्यूज

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइनही मिळणार बाजारासारखी भाजी खरेदीची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Union Budget

दरम्यान, 2024 मधील आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प लोकप्रिय ठरेल, अशी अपेक्षा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच होती. एकीकडे टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांपासून रस्त्यावरील विक्रेते आणि मजुरांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील लोकांना अर्थसंकल्पात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

काय स्वस्त होणार आहे?

- मोबाईल

- टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग

- इलेक्ट्रिक वाहने

- खेळणी

- कॅमेरा लेन्स

काय महाग होणार?

- सोने-चांदी दागिने महागणार

- विदेशी किचन चिमणी

- चांदीचे दागिने

- चांदीची भांडी

- सिगारेट

विभाग

पुढील बातम्या