मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UGC NET 2023: यूजीसी एनइटी परीक्षेची सिटी स्लिप जारी, 'या' लिंकवरून करा डाउनलोड

UGC NET 2023: यूजीसी एनइटी परीक्षेची सिटी स्लिप जारी, 'या' लिंकवरून करा डाउनलोड

Dec 02, 2023, 01:21 PM IST

    • UGC NET 2023 Exam City Slip Out: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी एनइटी डिसेंबर परीक्षेसाठी सिटी स्लिप जारी केली
UGC NET 2023 City Slip OUT

UGC NET 2023 Exam City Slip Out: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी एनइटी डिसेंबर परीक्षेसाठी सिटी स्लिप जारी केली

    • UGC NET 2023 Exam City Slip Out: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी एनइटी डिसेंबर परीक्षेसाठी सिटी स्लिप जारी केली

UGC NET 2023 city slip Downlod Link: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी एनइटी डिसेंबर परीक्षेसाठी सिटी स्लिप जारी केली आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून यूजीसी एनइटी सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

उमेदवार डिसेंबर सत्रासाठी यूजीसी एनईटी सिटी इंटिमेशन स्लिप २००३ मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांसारखी लॉगिन प्रमाणपत्रे वापरू शकतात. अॅडव्हान्स सिटी स्लिपमध्ये उमेदवाराचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरामध्ये असेल, याची माहिती मिळेल. प्रवेशपत्रामध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षेची तारीख, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्र, मार्गदर्शक तत्त्वे आणि बरेच काही यासारखे सर्व महत्त्वाचे तपशील असतील.

 

या दिवशी होणार परीक्षा

यूजीसी एनइटी डिसेंबर सत्र परीक्षा ६ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा देशभरातील २९२ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. एनटीएने परीक्षा सिटी स्लिप जारी केली आहे आणि प्रवेशपत्र देखील लवकरच जारी केले जाईल.

असे डाऊनलोड करा सिटी स्लिप

- ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

- डिसेंबर २०२३ अॅडव्हान्स सिटी इन्फॉर्मेशन स्लिपसाठी लिंकवर क्लिक करा.

- आवश्यकतेनुसार लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.

- यूजीसी नेट सिटी नोटिस डिसेंबर २०२३ तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

- ते डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

विभाग

पुढील बातम्या