मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'उद्धव ठाकरेंनीसुद्धा व्हेकेशनला यावं', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर

'उद्धव ठाकरेंनीसुद्धा व्हेकेशनला यावं', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर

Jun 24, 2022, 02:44 PM IST

    • महाराष्ट्राचे आमदार येऊन राहत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही असंही आसामचे मुख्यमंत्री म्हणाले होते.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

महाराष्ट्राचे आमदार येऊन राहत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही असंही आसामचे मुख्यमंत्री म्हणाले होते.

    • महाराष्ट्राचे आमदार येऊन राहत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही असंही आसामचे मुख्यमंत्री म्हणाले होते.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या चर्चेची सुरुवात आसामपासून (Assam) होत आहे. आसामच्या गुवाहाटीत (Guwahati) शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे(Ekanth Shinde) यांनी बंडखोरीनंतर ठिय्या मांडला आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेसह अपक्ष आमदारही आहेत. अजुनही काही आमदार गुवाहाटीला जात आहेत. नुकतेच आमदार दिलिप लांडे हेसुद्धा हॉटेलमध्ये पोहोचले. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा (Hemant Biswa Sarma) यांना विचारले असता ते म्हणाले की, "मला तुमच्याकडूनच समजलं की आणखी आमदार इथं येतायत. मी देशातील सर्वच आमदारांना आमंत्रण देतो की इथे या."

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

मी इथल्या हॉटेलमध्ये येण्यापासून कोणाला रोखू शकत नाही. देशात फेडरल स्ट्रक्चर सुरू आहे, तुम्ही आसामच्या हॉटेलमध्ये येऊ नका असं सांगू शकत नाही. मला माहिती नाही ते किती दिवस राहणार आहेत पण जितके दिवस राहतील तेवढं चांगलं, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असं मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्हा काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता "तुम्हीही व्हेकेशनला या" असं मी उद्धव ठाकरेंना सांगेन अशी मिश्किल प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली. महाराष्ट्रातील राजकारणाशी आमचा काही संबंध नाही असंही मुख्यमंत्री सरमा यांनी काल रात्री म्हटलं होतं.

हेमंत बिस्व सरमा यांनी याआधी म्हटलं होतं की, आसाम एक पर्यटन स्थळ आहे, राज्याची ही एक वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स असून तिथे येऊन कुणीही थांबू शकतं. महाराष्ट्राचे आमदार येऊन राहत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही. इतर राज्यातील आमदारही इथे यऊन राहू शकतात.

एका दिवसाला ८ लाख रुपये खर्च
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदारांचे वास्तव्य गेल्या दोन दिवसांपासून गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहे. हॉटेलबाहेर पोलिसांची मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. इतर कोणालाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाहीय.७ दिवसांसाठी ७० खोल्या बूक केल्या असून याचा खर्च दिवसाला जवळपास ८ लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळते.

पुढील बातम्या