मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जंगली हत्तीने दोन ग्रामस्थांना पायाखाली चिरडले; ग्रामस्थ संतप्त

जंगली हत्तीने दोन ग्रामस्थांना पायाखाली चिरडले; ग्रामस्थ संतप्त

Feb 21, 2023, 12:52 PM IST

    • कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात जंगली हत्तींचा हैदोस सुरू असून हत्तीच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांना मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. (Wild Elephant Killed Two Villager)
Two people killed in wild elephant attack in Karnataka (HT_PRINT)

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात जंगली हत्तींचा हैदोस सुरू असून हत्तीच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांना मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. (Wild Elephant Killed Two Villager)

    • कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात जंगली हत्तींचा हैदोस सुरू असून हत्तीच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांना मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. (Wild Elephant Killed Two Villager)

जंगली हत्तीच्या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याची घटना कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली. मृतांमध्ये एका २१ वर्षाच्या तरुणीचा समावेश आहे. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रंजिता (वय २१) ही तरुणी पेराडका येथील सहकारी दूध संस्थेमध्ये नोकरी करत होती. पहाटे ६ः३० वाजता ऑफिसमध्ये जात असताना तिच्या घराजवळ एका जंगली हत्तीने हल्ला केला. तिने मदतीसाठी आरडाओरड केला असता रमेश राय (वय५५) तिच्या मदतीसाठी धावून गेले. या हत्तीने नंतर रमेश यांच्यावर हल्ला केला. यात रमेशचा जागीच मृत्यू झाला. तर नेलयादी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रंजिताचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून राय यांचा मृतदेह रुग्णालयातून घेऊन जाण्यास नकार दिला. उप वनसंरक्षक आणि उपायुक्तांनी घटनास्थळी येण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. दरम्यान परिसरातील हत्तींचा उपद्रव मोबाइल कॅमेऱ्याने शुट करणाऱ्या एका तरुणाचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हिडिओ डिलिट केल्यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले होते.

जंगली हत्तीच्या उपद्रवाबाबत वन विभागाकडे अनेकवेळा तक्रार दाखल करून देखील वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नारायण शेट्टी या स्थानिक नागरिकाने केला.

जंगली हत्ती पिकांचे फार नुकसान करत असल्याने या परिसरातील नागरिक आधीपासून त्रस्त होते. आता ग्रामस्थांवर हल्ले करून त्यांना ठार मारत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगली हत्ती येऊच नये यासाठी वनविभाग काहीच उपाय करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक डॉ. वाय. के. दिनेश कुमार यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. शिवाय वनाधिकाऱ्यांची एक तुकडी गावात तैनात ठेवण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी यावेळी मृतक तरुणी रंजिताच्या कुटुंबियांची भेट घेऊन सरकारकडून कुटुंबियांना १५ लाख रुपये मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच रंजिताच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

पुढील बातम्या