मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Twitter Edit Button : ट्विटरची ग्राहकांना खास भेट.. आता ट्विट Edit करता येणार

Twitter Edit Button : ट्विटरची ग्राहकांना खास भेट.. आता ट्विट Edit करता येणार

Sep 01, 2022, 09:13 PM IST

    • ट्विटर युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच ट्विट एडिट करण्याचा पर्याय युजर्सना मिळणार आहे. 
ट्विटEdit करता येणार

ट्विटर युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच ट्विट एडिट करण्याचा पर्याय युजर्सना मिळणार आहे.

    • ट्विटर युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच ट्विट एडिट करण्याचा पर्याय युजर्सना मिळणार आहे. 

Twitter युजर्झसाठी खुशखबर आहे. कंपनी असे फिचर आणणार आहे, ज्याची युजर्स गेल्या अनेक वर्षापासून वाट पहात होते. Twitter लवकरच आपल्या यूजर्सना एक खास भेट देऊ शकते. कंपनीने गुरुवारी घोषणा केली की, निवडक ट्विटर यूजर्ससाठी बहुप्रतिक्षित Edit Button उपलब्ध करणार आहे. कंपनीने सांगितले की, येणाऱ्या काही आठवड्यात हे फिचर ब्लू टीक असणाऱ्या  ग्राहकांसाठी  रोलआउट केले जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

हे फीचर यूजर्सला पोस्ट केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत ट्वीटमध्ये बदल करण्याची परवानगी देईल आणि एक एडिटेड ट्वीट इंडीकेटर प्रदर्शित करेल की, ट्वीट एडिट झाले आहे. विशेष म्हणजे युजर्स एडिटेड ट्वीटसोबत ओरिजनल ट्वीटबी पाहू शकतील. सध्या एकदा पोस्ट केलेले ट्विट पुन्हा एडिट केले जाऊ शकत नव्हते. बदल दर्शवण्यासाठी यूजर्सना पुन्हा ट्विट करावे लागत होते. तर जाणून घेऊया कसे काम करणार नवीन फिचर..

ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार सध्या एडिट बटनाची टेस्टिंग केली जात आहे. येणाऱ्या काही दिवसात हे बटण ट्विटर ब्लू यूजर्ससाठी सादर केले जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की, अन्य क्षेत्रात वापर करण्यापूर्वी एकाच देशात प्रायोगिक तत्वावर टेस्ट केले जाईल. ट्विटर ब्लू कंपनीची प्रीमियम सब्सक्रिप्शन सेवा आहे. याच्या माध्यमातून या यूजर्संना अन्य यूजर्सपेक्षा नवीन व एक्सक्लूसिव्ह फीचर्स प्रदान केले जातात. 

या नव्या पर्यायामुळे ट्वीट बदलता येणार आहे पण यामध्ये एक छोटा ट्विस्ट आहे.   ट्वीट एडिट करायचा पर्याय मिळेल पण युजर्सला ट्वीटची संपूर्ण हिस्ट्री पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही केलेल्या पहिल्या ट्विटपासून ते तुम्ही बदलेल्या ट्विटपर्यंत. भारतात ही सुविधा कधीपासून येणार याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण व्हेरिफाईट ट्विटर अकाउंट असणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे ट्वीट कोणी पाहिले हे देखील तुम्हाला समजणार आहे.  ट्विटरच्या  ३२०  मिलियनहून अधिक युजर्सना याचा फायदा होणार आहे. 

होऊ शकतो गैरवापर - टेक एक्सपर्ट 
२०२० मध्ये वायर्डसोबत केलेल्या एका मुलाखतीत तत्कालीन ट्विटर सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटले होते की, कंपनी कदाचित कधीच ट्वीट एडिट  करण्याची  सुविधा  उपलब्ध करू शकणार नाही. काही टेक एक्सपर्ट्सनी इशारा दिला आहे की, "edit tweet" बटणाचा वापर आपली विधाने बदलण्यासाठी होऊ शकतो. जेव्हा दुसऱ्यांनी रिट्वीट किंवा सपोर्ट केले असेल. एडिट बटण ट्विटर ब्लू च्या अन्य संबंधित फीचर्स जसे अनडू बटणसारखं काम करेल. अनडू बटण ३० सेकंदापर्यंत ट्वीट रद्द  करण्यासाठी वापरले जाते. 

पुढील बातम्या