मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  TV Channels Free : डिजीटल इंडिया मोहिमेला मोठं यश; टीव्हीवरील चॅनेल्स पाहा मोबाईलवर तेही इंटनेटविना

TV Channels Free : डिजीटल इंडिया मोहिमेला मोठं यश; टीव्हीवरील चॅनेल्स पाहा मोबाईलवर तेही इंटनेटविना

Aug 07, 2023, 10:15 AM IST

  • TV Channels Free On Mobile : भारताच्या डिजीटल इंडिया मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता नागरिकांना इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवर पाहता येणार आहे.

TV Channels Free On Smart Phone (HT)

TV Channels Free On Mobile : भारताच्या डिजीटल इंडिया मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता नागरिकांना इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवर पाहता येणार आहे.

  • TV Channels Free On Mobile : भारताच्या डिजीटल इंडिया मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. टीव्हीवरील सर्व चॅनेल्स आता नागरिकांना इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवर पाहता येणार आहे.

TV Channels Free On Smart Phone : केंद्रातील मोदी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या डिजीटल इंडिया मोहिमेला मोठं यश आलं आहे. कारण आता आयआयटी कानपूर आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने 'डायरेक्ट टू मोबाईल' या उपक्रमाद्वारे कोणत्याही इंटरनेट शिवाय नागरिकांना मोबाईलवर टीव्ही चॅनेल्स पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे. डायरेक्ट टू मोबाईल ही सेवा ब्रॉडबॅण्ड आणि ब्रॉडकास्टचं एकत्रित स्वरुप असून ते रेडिओ लहरींच्या माध्यमातून काम करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता या उपक्रमाद्वारे भारतातील नागरिकांना लवकरच इंटरनेट शिवाय टीव्ही चॅनेल्स पाहता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर यांनी एकत्र येत एक संयुक्त उपक्रमावर काम करण्याचं ठरवलं आहे. त्यात डायरेक्ट टू मोबाईल या नव्या उपक्रमाद्वारे भारतातील नागरिकांना कोणत्याही इंटरनेट शिवाय टीव्ही चॅनेल्स पाहता येणार आहे. त्यामुळं भारतातील डोंगराळ तसेच इंटरनेट सेवा न पोहचू शकणाऱ्या भागातीलन नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. डायरेक्ट टू मोबाईल ही सुविधा देशात कधीपासून सुरू होईल, याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या उपक्रमाच्या तांत्रिक बाजूंचं काम पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट टू मोबाईल सेवा सुरू करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतात ५जी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा नागरिकांना लाभ घेता येत आहे. सध्या ऑनलाईन गेम्स, व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रमिंग, न्यूज चॅनल्स, वेब सिरिज आणि चित्रपट नागरिकांना सहजरित्या पाहता येतात. परंतु त्यासाठी पैसे देऊन इंटरनेटची सेवा घ्यावी लागते. परंतु आता कोणत्याही इंटरनेट शिवाय नागरिकांना टीव्ही चॅनेल्स पाहता येणारी डायरेक्ट टू मोबाईल सेवा भारतात सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

पुढील बातम्या