मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Israel-Hamas Truce end : इस्रायल-हमासदरम्यानची युद्धबंदी संपली; इस्रायलकडून गाझावर पुन्हा बॉम्बफेक

Israel-Hamas Truce end : इस्रायल-हमासदरम्यानची युद्धबंदी संपली; इस्रायलकडून गाझावर पुन्हा बॉम्बफेक

Dec 01, 2023, 01:34 PM IST

    • इस्रायल आणि हमासदरम्यानची युद्धबंदी संपली आहे. युद्धबंदी संपल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीवर आजपासून पुन्हा बॉम्बफेक सुरू केली आहे. 
इस्त्रायल आणि हमासदरम्यान युद्धविराम संपवल्यानंतर आज, शुक्रवारी इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. यात ९ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. (AFP)

इस्रायल आणि हमासदरम्यानची युद्धबंदी संपली आहे. युद्धबंदी संपल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीवर आजपासून पुन्हा बॉम्बफेक सुरू केली आहे.

    • इस्रायल आणि हमासदरम्यानची युद्धबंदी संपली आहे. युद्धबंदी संपल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीवर आजपासून पुन्हा बॉम्बफेक सुरू केली आहे. 

इस्रायल आणि हमासदरम्यानची युद्धबंदी संपली आहे. युद्धबंदी संपल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीवर आजपासून पुन्हा बॉम्बफेक सुरू केली आहे. अमेरिका तसेच मध्यपूर्वेतील कतार आणि इजिप्त या देशांसह काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी मध्यस्थी केल्यानंतर इस्त्रायल आणि हमासने २२ नोव्हेंबर रोजी सुरूवातीला चार दिवसांसाठी युद्धबंदी लागू केली होती. त्यानंतर आणखी चार दिवसांसाठी युद्धविरामचा विस्तार करण्यात आला होता. परंतु आज १ डिसेंबर, शुक्रवारी, स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजता हा युद्धविराम कालबाह्य झाल्याने इस्त्रायली लष्कराकडून हल्ले सुरू करण्यात आले. युद्धविराम संपल्यामुळे गाझामध्ये इस्त्रायलकडून लष्करी कारवाई आणि हवाई हल्ले पुन्हा सुरू करण्यात आल्याचे इस्त्रायलकडून सांगण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

दरम्यान, इस्त्रायलने पुन्हा सुरू केलेल्या लष्करी कारवाईमध्ये दोन तासांच्या कालावधीत ९ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने दिली.

गाझामधून हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायली बंदिवानांची सुटका केल्यानंतर युद्धबंदीच्या सातव्या दिवशी देवाणघेवाणीद्वारे इस्रायलने ३० पॅलेस्टिनी कैद्यांची तुरुंगातून सुटका केली होती.

युद्धविराममधून काय साध्य झालं?

कतारच्या मध्यस्थीनंतर इस्त्रायल आणि हमासमध्ये झालेल्या युद्धविराम करारानुसार इस्रायलच्या तुरुंगात कैदी म्हणून बंदी असलेल्या ३०० पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार या कैद्यांची सुटका करून त्यांना वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील त्यांच्या घरी परत पाठवले गेले होते. तर हमासच्या ताब्यात असलेल्या २४० ओलिसांपैकी ५६ ओलिसांची सुटका करण्यात आली होती. यामध्ये ३९ इस्त्रायली नागरिक आणि इतर थायलंड, रशिया आणि अमेरिकेचे नागरिक होते.

युद्धविरामदरम्यान इस्रायलने गाझामध्ये अतिरिक्त इंधन आणि मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत जाऊ देण्यासही सहमती दर्शविली होती. इस्त्रायलच्या लष्कराकडून वेढा घातलेल्या पॅलेस्टिनी भूभागाला सध्या अभूतपूर्व अशा मानवतावादी संकटाचा सामना करावा लागतोय. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टीमध्ये इंधन आणि मदत पुरवठा रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ युद्धबंदी केल्यामुळे गाझापट्टीतील नागरिकांना याचा लाभ झाला होता.

७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर रॉकेट हल्ले केले होते. त्यानंतर हमासचा बिमोड करण्यासाचे सांगत इस्त्रायने गाझावर जोरदार हवाई हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांमध्ये १५ हजाराहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० नागरिक ठार झाले होते.

पुढील बातम्या