मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तृतीयपंथीयाने सेक्ससाठी वापरलं नकली लिंग, १० वर्षेत तुरुंगवासाची शिक्षा

तृतीयपंथीयाने सेक्ससाठी वापरलं नकली लिंग, १० वर्षेत तुरुंगवासाची शिक्षा

HT Marathi Desk HT Marathi

Jul 29, 2022, 01:53 PM IST

    • तृतीयपंथी पुरुषाने दोन महिला आणि अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंधावेळी प्रोस्थेटिक पेनिसचा वापर केल्याचं सिद्ध झालं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लैंगिक संबंधावेळी प्रोस्थेटिक लिंग वापरल्यानं तृथीयपंथीयाला १० वर्षांचा तुरुंगवास (फोटो - एपी)

तृतीयपंथी पुरुषाने दोन महिला आणि अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंधावेळी प्रोस्थेटिक पेनिसचा वापर केल्याचं सिद्ध झालं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    • तृतीयपंथी पुरुषाने दोन महिला आणि अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंधावेळी प्रोस्थेटिक पेनिसचा वापर केल्याचं सिद्ध झालं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एका तृतीयपंथी व्यक्तीने नकली लिंग वापरून लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लंडनमध्ये तृतीयपंथी पुरुषाने दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवले. मात्र त्याने नकली लिंग वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. ३२ वर्षांच्या तरजीत सिंह हा मुलगी म्हणून जन्मला. मात्र आता तो एक पुरुष म्हणून वावरतो, तशीच त्याची ओळख आहे. तरजीत सिंह याने लैंगिक संबंधावेळी प्रोस्थेटिक पेनिसचा वापर केल्याचं सिद्ध झालं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

स्नेरेसब्रूक क्राऊन कोर्टात याप्रकरणी सुनावणी पार पडली. तरजीत सिंहला लैंगिक संबंधावेळी हल्ल्याशी संबंधित तीन प्रकरणात, शारीरिक इजा केल्याबद्दल सहा प्रकरणात आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे या प्रकऱणाची सुनावणी करताना अशी माहिती समोर आली की तरजीतने एका पीडितेला पेटवून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या नाकावर मोबाईल मारून जखमीसुद्धा केलं होतं. इतकंच नाही तर त्याने मारहाणसुद्धा केल्याचं आढळून आलं आहे.

न्यायाधीश ऑस्कर डेल फॅब्रो यांनी त्यांच्या निर्णयात म्हटलं की, तरजीत सिंह भविष्यात लोकांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. तो एक धोकादायक गुन्हेगार आहे, ज्याने तीन पीडितांविरोधात सतत हिंसाचार केला. हल्ले केले आहेत. तसंच तरजीत हा खोटं बोलण्यात पटाईत आहे. त्यानं अनेक लोकांना खोटं सांगितलं आहे.

न्यायाधीशींना त्यांच्या निर्णयात असंही सांगितलं की, तरजीत सिंह कधीच मोकळेपणानं बोलला नाही. तसंच त्याच्या लैंगिक आयुष्याबाबतही प्रामणिक नव्हता. त्याने छळवणूक केली. तरजीत इतरांसमोर स्वत:ला पुरुष असल्याचं दाखवत राहिला. पीडित महिलेनं आपण यामुळे नैराश्यात गेल्याचं आणि त्याची औषधं घ्यावी लागल्याचं म्हटलं आहे.

विभाग

पुढील बातम्या