मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका, पेट्रोल-डिझेलही महागणार? जाणून घ्या आजचे दर

कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका, पेट्रोल-डिझेलही महागणार? जाणून घ्या आजचे दर

Jun 10, 2022, 08:12 AM IST

    • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर ही वाढ होतच राहिली तर देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पेट्रोल डिझेलचे दर स्थिर (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर ही वाढ होतच राहिली तर देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

    • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर ही वाढ होतच राहिली तर देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Today's Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. कच्या तेलाचे दर प्रति बॅरल १२५ डॉलर इतके झाले असले तरी भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. आजचे इंधन दर जाहीर करण्यात आले असून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल जवळपास साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (today fuel price petrol diesel rate)

ट्रेंडिंग न्यूज

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

रशिया युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठे बदल झाले. कच्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज कच्च्या तेलाचे दर १२५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले असून जर ही वाढ होतच राहिली तर देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी नवे दर जारी केले असून त्यानुसार दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर इतके आहे, तर डिझेल ८९.६२ रुपयांना विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १११.३५ रुपये आणि डिझेल ९७.२८ रुपये प्रति लिटर इथके आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये असून डिझेल ९२.७६ रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात असून डिझेलची किंमत ९४.२४ रुपये इतकी आहे.

गेल्या महिन्यात २१ तारखेला केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर अबकारी करात मोठी कपात करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशात सध्या पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त ८४.१० रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे. तर डिझेल ७९.७४ रुपयांना आहे. सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात परभणीमध्ये ११४.३८ रुपयांना आहे.

 

विभाग

पुढील बातम्या