मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railway : ऑफिसातील व्हीव्हीआयपी संस्कृतीला चाप; रेल्वे मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Indian Railway : ऑफिसातील व्हीव्हीआयपी संस्कृतीला चाप; रेल्वे मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Feb 22, 2023, 09:52 AM IST

  • Indian Railway : भारतीय रेल्वेने व्हीव्हीआयपी संस्कृती बंद करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. पूर्वी रेल्वे अटेंडंटना बोलावण्यासाठी बेल वाजवण्याची पद्धत बंद करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिली आहेत.

Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वेने व्हीव्हीआयपी संस्कृती बंद करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. पूर्वी रेल्वे अटेंडंटना बोलावण्यासाठी बेल वाजवण्याची पद्धत बंद करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिली आहेत.

  • Indian Railway : भारतीय रेल्वेने व्हीव्हीआयपी संस्कृती बंद करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. पूर्वी रेल्वे अटेंडंटना बोलावण्यासाठी बेल वाजवण्याची पद्धत बंद करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिली आहेत.

दिल्ली : विविध स्तरांवरील व्हीव्हीआयपी संस्कृती बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीकोनानुसार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना कार्यालयात अटेंडंटना बोलावण्यासाठी वापरली जाणारी घंटा काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. बेल एवजी अटेंडंटना आता स्वत: जाऊन किंवा आवाज देऊन बोलवावे लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

ऑफिसबॉय किंवा ऑफिस अटेंडंटना बोलावण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात बेल वाजवण्याची पद्धत आहे. ही बेल वाजल्यावर ऑफिस अटेंडंट हा कार्यालयात येऊन संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकत असतो. मात्र, रेल्वे मंत्रालयाने व्हीव्हीआयपी संकृती बंद करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार रेल्वेमंत्र्यांनी आदेश दिले आहे की, कार्यालयात असलेल्या बेलचा वापर आता ऑफिस अटेंडंटना बोलवण्यासाठी करण्यात येऊ नये. त्या एवजी स्वत: उठून त्यांना वैयक्तिकरित्या बोलावले जावे. या सूचनेची पूर्ण अंमलबजावणी होईल याची खात्री करण्यासाठी, वैष्णव यांनी आधी स्वतःच्या कार्यालयातील घंटा काढून टाकली आहे.

कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला समान सन्मान मिळावा आणि व्हीव्हीआयपी संस्कृतीची मानसिकता बदलावी, या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आल्याचे मंत्री कार्यालयाने सांगितले. यासोबतच, प्रत्येक कर्मचाऱ्याने १०० टक्के रेल्वे पूर्ण वेगाने चालवावी, अशीही मंत्र्यांची इच्छा आहे, जी शून्य टक्के व्हीव्हीआयपी संस्कृतीतच शक्य आहे, असे देखील ते म्हणाले.

यापूर्वी देखील वैष्णव यांनी त्यांच्या कार्यालयातील कार्यसंस्कृती बदलण्यासाठी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात एकमेकांच्या कामाबद्दल निष्ठा आणि विश्वास निर्माण करण्यासाठी थेट संवाद प्रस्थापित करण्यासाठी असे उपक्रम घेतले होते.

विभाग

पुढील बातम्या