मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IAS अधिकारी टीना डाबीची UPSC ची मार्कशीट व्हायरल, पाहा किती मिळाले होते गुण

IAS अधिकारी टीना डाबीची UPSC ची मार्कशीट व्हायरल, पाहा किती मिळाले होते गुण

Jan 27, 2023, 06:31 PM IST

  • IAS Tina dabi marksheet : २०१५ मध्ये युपीएससी टॉपर राहिलेल्या टीना डाबी यांची मार्कलिस्ट समाजमाध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे.

टीना डाबी

IAS Tina dabi marksheet : २०१५ मध्ये युपीएससी टॉपर राहिलेल्या टीना डाबी यांची मार्कलिस्ट समाजमाध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे.

  • IAS Tina dabi marksheet : २०१५ मध्ये युपीएससी टॉपर राहिलेल्या टीना डाबी यांची मार्कलिस्ट समाजमाध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे.

IAS Tina Dabi Marksheet: टीना डाबीला आयएएस अधिकारी बनून बरीच वर्षे उलटून गेली आहेत, परंतु ती कायम चर्चेतअसते. पुन्हा एकदा टीनाची मार्कशीट व्हायरल झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर टीना प्रसिद्धीच्या झोतात आली. हजारो विद्यार्थी तिला आपला आदर्श मानतात.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

टीना UPSC सिव्हिल सर्व्हिसेस २०१५ च्या परीक्षेत बसली आणि चांगल्या गुणांनी ती उत्तीर्ण झाली. यूपीएससी सीएसई परीक्षेत टॉप करणारी ती एससी श्रेणीतील पहिली महिला ठरली. टीना डाबीने एकूण १०६३ गुण मिळवून AIR-1 रँक मिळवली. टीना डाबीने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमध्ये असताना यूपीएससीची तयारी सुरू केली होती. डाबी यांनी बीए पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.

अभ्यासा दरम्यान, तिने स्वतःचे वेळापत्रक आणि अभ्यासाचे वेळापत्रक देखील तयार केले जे तिने काटेकोरपणे पाळले. टीना डाबी सध्या राजस्थान कॅडरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी म्हणून काम करतात. दरम्यान UPSC २०२३ पूर्व परीक्षा अधिसूचना पुढील आठवड्यात अधिकृत वेबसाइट upsc.gov.inवर प्रसिद्ध केली जाईल. ही परीक्षा मे२०२३मध्ये होणार आहे.

 

विभाग

पुढील बातम्या