मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tiger Attacked : उत्तर प्रदेशात पुरामुळे हाहाकार! जंगलातून बाहेर पडत वाघांचा नागरिकांवर हल्ला

Tiger Attacked : उत्तर प्रदेशात पुरामुळे हाहाकार! जंगलातून बाहेर पडत वाघांचा नागरिकांवर हल्ला

Sep 23, 2022, 09:31 AM IST

    • Tiger Attacked in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील लखीमपुर जिल्ह्यात नेपाळहून येणाऱ्या अनेक नद्यांना पुर आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिकुनिया पासून मंझरा पूर्व आणि बहराइच येथील कतर्निया घाटातील जंगलात पुराचे पाणी पसरले आहे. यामुळे येथील वाघ हे जंगलातून बाहेर आले असून नागरिकांवर हल्ले करत आहेत.
Tiger Attacked

Tiger Attacked in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील लखीमपुर जिल्ह्यात नेपाळहून येणाऱ्या अनेक नद्यांना पुर आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिकुनिया पासून मंझरा पूर्व आणि बहराइच येथील कतर्निया घाटातील जंगलात पुराचे पाणी पसरले आहे. यामुळे येथील वाघ हे जंगलातून बाहेर आले असून नागरिकांवर हल्ले करत आहेत.

    • Tiger Attacked in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील लखीमपुर जिल्ह्यात नेपाळहून येणाऱ्या अनेक नद्यांना पुर आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिकुनिया पासून मंझरा पूर्व आणि बहराइच येथील कतर्निया घाटातील जंगलात पुराचे पाणी पसरले आहे. यामुळे येथील वाघ हे जंगलातून बाहेर आले असून नागरिकांवर हल्ले करत आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपुर जिल्ह्यातील तराई परिसरात नेपाळहून आलेल्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पुर आला आहे. तिकुनिया पासून ते मंझरा पूर्व आणि बहराइचच्या कतर्निया घाटात पुराचे पाणी भरले आहे. यामुळे जंगलातील वाघ हे मानवी वस्तीत आले असून ऊसाच्या शेतात ठाण मांडून बसले आहेत. एका आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वनाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांना जंगलात न जाण्याचा सल्ला दिला आहे. वाघांना पकडण्यासाठी जागोजागी कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

बफर झोन आणि कतर्निया घाटातील जंगलाच्या जवळील भागतात वाघांची दहशत पसरली आहे. येथील मंझरा पूर्व परिसरात गेल्या दोन वर्षात वाघांच्या हल्ल्यात २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाने जून महिन्यात दहशत माजवणाऱ्या एका नर आणि एक मादी वाघिणीला पिंजऱ्यात बंद केले होते. या नंतर अडीच महीने या ठिकाणी वाघांच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, अचानक नद्यांचे पाणी हे जंगलात घुसल्याने पुन्हा वाघांचे नगरिकांवरील हल्ले हे वाढले आहेत.

जंगलात पाणी भरल्याने वाघांनी आपले राहण्याचे ठिकाण बदलन्यास सुरुवात केली आहे. ते जंगलातून बाहेर पडत असून नागरिकांवर हल्ले करत आहेत. १५ दिवसांच्या कालावधीत वाघांनी २ नागरिकांना ठार मारले आहे. ५ संपटेंबर आणि १९ सप्टेंबर रोजी हे हल्ले झाले. १३ तारखेलाही एका नागरिकावर वाघाने हल्ला केला होता. मात्र, ग्रामस्थांनी या नागरिकाचे प्राण वाचवले. दुधवा टाइगर रिजर्वचे प्रमुख संजय पाठक या बाबत माहिती देताना म्हणाले, यावेळी जंगलात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. त्यामुळे या जंगलातून बाहेर पडून वाघ हे ऊसाच्या शेतीत लपून बसले आहेत. आम्ही वाघांच्या ठिकाणांचा शोध घेत आहोत. या साठी जागोजागी कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले आहेत.

पिंजऱ्यांजवळ येईना वाघ; कॅमेऱ्यांची जागा बदलली

वाघाचे लोकशन माहिती करण्यासाठी येथील पारसपुर गावातील शेतामध्ये कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, हे वाघ हुलकावणी देत असल्याने हे कॅमेरे गुरुवारी येथून काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले आहे. तीन दिवस होऊनही अद्याप एकही वाघ या कॅमेऱ्या जवळून गेलेला नाही. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी वाघाच्या पायांचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे आता त्या परिसरात देखील कॅमेरे लावण्यात आले आहेत.

धौरहरा येथील रेंजर गजेंद्र सिंह यांनी सांगितले की, वाघांच्या पायांचे ठसे पाहता कॅमेऱ्यांची जागा बदलण्यात आली आहे. रेंजरने दिलेल्या माहितीनुसार वाघाचे लोकेशन शोधण्यासाठी त्यांचे एक पथक रात्रंदिवस काम करत आहेत. या ठिकाणी असलेल्या ऊसाच्या शेतीमुळे वाघांचा शोध घेण्यास अडचणी येत असल्याने त्यांनी सांगितले.

 

पुढील बातम्या