मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttarakhand Crisis: गोव्यानंतर उत्तराखंडात कॉंग्रेसला खिंडार; ‘आप’ला लॉटरी

Uttarakhand Crisis: गोव्यानंतर उत्तराखंडात कॉंग्रेसला खिंडार; ‘आप’ला लॉटरी

Jul 12, 2022, 10:11 AM IST

    • Uttarakhand Political Crisis: गोव्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासहित कॉंग्रेसचे ११ आमदार नाराज असून ते भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता कॉंग्रेसला उत्तराखंडमध्ये आणखी एक जोरदार धक्का बसला आहे.
Congress Political Crisis In Uttarakhand (HT)

Uttarakhand Political Crisis: गोव्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासहित कॉंग्रेसचे ११ आमदार नाराज असून ते भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता कॉंग्रेसला उत्तराखंडमध्ये आणखी एक जोरदार धक्का बसला आहे.

    • Uttarakhand Political Crisis: गोव्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासहित कॉंग्रेसचे ११ आमदार नाराज असून ते भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता कॉंग्रेसला उत्तराखंडमध्ये आणखी एक जोरदार धक्का बसला आहे.

Uttarakhand Political Crisis: कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराजी दर्शवत गोव्यातील ११ कॉंग्रेस आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. सध्या कॉंग्रेससाठी गोव्यात राजकीय पेच निर्माण झालेला असतानाच आता पक्षाला उत्तराखंडमध्ये मोठं राडकीय भगदाड पडलं आहे. कारण उत्तराखंड कॉंग्रेसमधील तीन वरिष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम करत केजरीवालांच्या आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. कॉंग्रेस प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रतूडी, उत्तराखंड कॉंग्रेस महिला उपाध्यक्ष कमलेश रमन आणि पक्षाचे सोशल मीडिया पदाधिकारी कुलदीप चौधरी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

कॉंग्रेसला बसलेल्या या झटक्यानंतर नेत्यांनी उत्तराखंडचे माजी मंत्री हरक सिंह रावत यांच्या घरी तातडीनं बैठक बोलावली असून यात डॅमेज कंट्रोल करण्याबाबतची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. याशिवाय सध्याच्या पक्षफुटीवर काही नेत्यांनी चिंता व्यक्त केल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे पक्षफुटीवर मंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अतिमहत्त्वाच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस महासचिव हरीश रावत यांनी दांडी मारली आहे. 'कॉंग्रेसच्या या तीन मातब्बर नेत्यांचं पक्षात आगमन झाल्यानं उत्तराखंडमध्ये आपला बळकटी मिळेल, विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचा पराभव झाला असल्यानं त्यांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळं नेते पक्ष सोडत आहेत', असं उत्तराखंडमधील आपचे संयोजक जोत सिंह बिष्ट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

त्यामुळं आता गोव्यानंतर उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला उत्तराखंडमध्ये बहुमत मिळेल, असा अंदाज अनेक सर्वे आणि राजकीय जाणकारांनी अंदाज वर्तवलेला असतानाही अंतर्गत गटबाजीमुळं कॉंग्रेसला हार पत्करावी लागली होती. त्यामुळं आता नेत्यांनी पक्ष सोडणं ही त्याचीच परिनिती असल्याचं बोललं जात आहे.

गोव्यात नेमकं काय घडतंय?

रविवारी गोव्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे मातब्बर नेते मायकल लोबो यांच्यासहित ११ आमदार नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर पक्षानं त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून पदमुक्त केलं. याशिवाय हे कॉंग्रेसमधील असंतुष्ट आमदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भेटल्याच्या चर्चा आहे. त्यामुळं हे आमदार भाजपमध्ये जाणार की स्वतंत्र गट तयार करणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

पुढील बातम्या