मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बापरे.. चक्क जिभेवर उगवलेत काळे केस, डॉक्टरांनी सांगितले यामागील कारण

बापरे.. चक्क जिभेवर उगवलेत काळे केस, डॉक्टरांनी सांगितले यामागील कारण

Mar 14, 2022, 04:20 PM IST

  • एका व्यक्तीची जीभ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीच्या जीभेवर चक्क काळे केस उगवले आहेत. जसे शरीराच्या इतर भागांवर असतात तसेच. ही अजब घटना पाहून डॉक्टर्स देखील चक्रावून गेले आहेत. यामागील कारणांचा डॉक्टरांनी ऊहापोह केला आहे.

जिभेवर उगवलेले काळे केस (HT)

एका व्यक्तीची जीभ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीच्या जीभेवर चक्क काळे केस उगवले आहेत. जसे शरीराच्या इतर भागांवर असतात तसेच. ही अजब घटना पाहून डॉक्टर्स देखील चक्रावून गेले आहेत. यामागील कारणांचा डॉक्टरांनी ऊहापोह केला आहे.

  • एका व्यक्तीची जीभ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीच्या जीभेवर चक्क काळे केस उगवले आहेत. जसे शरीराच्या इतर भागांवर असतात तसेच. ही अजब घटना पाहून डॉक्टर्स देखील चक्रावून गेले आहेत. यामागील कारणांचा डॉक्टरांनी ऊहापोह केला आहे.

मानवी शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर केस वाढतात, परंतु तुम्ही कधी ऐकले आहे की एखाद्याच्या जिभेवर केस वाढले आहेत? तेही दाट आणि काळेभोर! असाच एक प्रकार अमेरिकेत समोर आला आहे.  मेडिकल क्षेत्र इतके चमत्कारिक घटनांनी व्याप्त आहे की, कधी-कधी डॉक्टरही विचारात पडतात. अशाच एक नवा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या चक्क जिभेवर काळे केस उगवले आहेत. जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.  जेव्हा हा व्यक्ती डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टरांच्या टीमने यामागची संपूर्ण कहानी सांगताना याचे कारण सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की, हा खूपच दुर्मिळ प्रकार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

 

दरम्यान एका मेडिकल रिपोर्टनुसार या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे, मात्र ही या घटनेचा सविस्तर रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये एका केस स्टडीच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, ५० वर्षीय व्यक्तीबाबत ही घटना घडली आहे. या व्यक्तीची जीभ काळ पडली होती व त्यावर केसासारखे काहीतरी उगवले होते. याला एक्सपर्ट्सनी ब्लॅक हेयर टंग सिंड्रोम नाव दिले आहे. 

रिपोर्टनुसार हे ब्लॅक हेयर एक प्रकारे अस्थायी आणि हानीकारक नाहीत. या सिंड्रोममध्ये जिभेच्या वरती डेड स्किन सेल्स निर्माण होतात. प्रतिजैविकांचे दुष्परिणाम, धूम्रपान किंवा मऊ आहार घेतल्याने देखील हे होऊ शकते. याशिवाय तोंडाची योग्य स्वच्छता न करणे, कोरडे तोंड हे देखील याचे कारण असू शकते. यामुळे जिभेचा रंग काळा पडू लागतो. 

सांगितले जात आहे की, यीस्ट व तंबाखूचे अधिक सेवन व त्याचवेळी हार्मोन्स सक्रिय झाल्याने अशी स्थिती समोर येत आहे. ब्लॅक हेयर टंग सिंड्रोममध्ये अनेक प्रकारचे लक्षण दिसत असतात. जसे, जिभेचा रंग पिवळा, काळा, पांढरा व डार्क ब्राउन होणे. त्याचबरोबर जीभेवर केस उगवणे व चव जाणे यादि त्रास होतो. 

रिपोर्टमध्ये ही गोष्टही नमूद करण्यात आली होती की, काही दिवसापूर्वी व्यक्तीच्या डाव्या अंगाला लकवा मारला होता. त्यानंतर डॉक्टरांनी व्यक्तीला लिक्विड डाइट घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी व्यक्तीला खाण्याच्या गोष्टी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून दिल्या जात होत्या. त्यानंतर अडीच महिन्यांनी त्यांचा सांभाळ करणाऱ्यांनी या व्यक्तीच्या जिभेवर काळे केस उगवल्याचे दिसले. सध्या यावर उपचार सुरू आहेत व काही दिवसांनी हा आजार काही प्रमाणात बरा होईल असे डॉक्टरांनी सांगितले. 

 

पुढील बातम्या