मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cheapest 7 seater Car: देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार तेही छोट्या बजेटमध्ये!

Cheapest 7 seater Car: देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार तेही छोट्या बजेटमध्ये!

Jul 18, 2022, 12:52 PM IST

    • Cheapest 7 seater Car in India: तुम्हाला तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी किंवा कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी परवडणारी कार घेयची असल्यास हा उत्तम पर्याय आहे.
स्वस्त आणि मस्त ७ सीटर कार (HT)

Cheapest 7 seater Car in India: तुम्हाला तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी किंवा कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी परवडणारी कार घेयची असल्यास हा उत्तम पर्याय आहे.

    • Cheapest 7 seater Car in India: तुम्हाला तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी किंवा कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी परवडणारी कार घेयची असल्यास हा उत्तम पर्याय आहे.

Affordable 7 Seater Car: कार क्षेत्रातील एमपीव्ही या सेगमेंटमध्ये कमी बजेटपासून ते उच्च श्रेणीपर्यंत ७ सीटर एमपीव्ही सहज उपलब्ध आहेत. हा एक लोकप्रिय विभाग आहे ज्यामध्ये आगामी कार देशांतर्गत आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे वापरल्या जात आहेत. तुम्हाला तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी किंवा कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी परवडणारी एमपीव्ही खरेदी करायची असल्यास, या विभागातील सर्वात स्वस्त ७ सीटर कारची किंमत ते वैशिष्ट्ये आणि मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

येथे आम्ही मारुती सुझुकी इको बद्दल बोलत आहोत जी या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त ७ सीटर कार आहे आणि ही कार तिच्या मायलेज, किंमतीशिवाय केबिन स्पेससाठी पसंत केली जाते.

मारुती इकोची किंमत

वरती नमूद केल्हीयाप्रमाणे ही देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार आहे, ज्याची प्रारंभिक किंमत ४.६३ लाख रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली) आणि ही किंमत आहे टॉप व्हेरियंटमध्ये ५.९४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

मारुती इको व्हेरिएंट

मारुती सुझुकीने आतापर्यंत या कारचे चार ट्रिम बाजारात आणले आहेत, ज्यामध्ये पहिली ट्रिम ५ सीटर स्टँडर्ड (O), दुसरी व्हेरिएंट ५ सीटर एसी (O), तिसरी व्हेरिएंट ५ सीटर एसी सीएनजी (ओ)  आणि चौथा प्रकार ७ सीटर स्टॅडर्ड (O) आहे.

मारुती इको इंजिन आणि ट्रान्समिशन

मारुती इकोच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने त्यात १.२ लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ७३ पीएस पॉवर आणि ९८ एमएम पीक टॉर्क जनरेट करते. सीएनजी किटवरील हेच १.२ लिटर पेट्रोल इंजिन ७३ पीएस पॉवर आणि ८५ एमएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मारुती इको मायलेज

मारुती इकोच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार पेट्रोलवर १६.११ kmpl आणि सीएनजी किटवर २०.८८ kmpl मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मारुती ईको फीचर्स

 मारुती ईको मध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने मॅन्युअल एसी, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, पुढच्या सीटवर सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट, रियर पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्स दिले आहेत. 

 

पुढील बातम्या