मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tata Nexon : ही गाडी पुन्हा एकदा ठरली अव्वल, पाहा गाडीत काय आहे अशी खास बात

Tata Nexon : ही गाडी पुन्हा एकदा ठरली अव्वल, पाहा गाडीत काय आहे अशी खास बात

Aug 15, 2022, 11:30 AM IST

  • Tata Nexon Best Selling Car For July 2020 : टाटा नेक्सॉन पुन्हा एकदा जुलै २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV बनली आहे. या गाडीने जुलै महिन्यात १४ हजारांपेक्षा जास्त वाहनांची विक्री केली आहे.

टाटा नेक्सॉन (हिंदुस्तान टाइम्स)

Tata Nexon Best Selling Car For July 2020 : टाटा नेक्सॉन पुन्हा एकदा जुलै २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV बनली आहे. या गाडीने जुलै महिन्यात १४ हजारांपेक्षा जास्त वाहनांची विक्री केली आहे.

  • Tata Nexon Best Selling Car For July 2020 : टाटा नेक्सॉन पुन्हा एकदा जुलै २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV बनली आहे. या गाडीने जुलै महिन्यात १४ हजारांपेक्षा जास्त वाहनांची विक्री केली आहे.

टाटा नेक्सॉन पुन्हा एकदा जुलै २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयुव्ही बनली आहे. याशिवाय, ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. टाटा नेक्सॉन ने जुलै महिन्यात १४ हजार २१४ वाहनांची विक्री केली, जी वार्षिक ३८ टक्क्यांनी वाढली आहे. टाटा नेक्सॉनची किंमत सात लाख ५९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी तेरा लाख ९४ हजार ९०० रुपयांपर्यंत जाते. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

यानंतर ह्युंदाई वेन्यूने टाटा पंचला मागे टाकत यावेळी दुसरे स्थान पटकावले. या ठिकाणी ह्युंदाई वेन्यू च्या १२ हजार वाहनांच्या विक्रीत तब्बल ४७ टक्के वाढ झाली आहे. टाटा पंच ११ हजार हून अधिक वाहनांच्या विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत सर्वाधिक विक्री होणारी मारुती सुझुकी ब्रेझा चौथ्या क्रमांकावर आहे. तथापि, येत्या काही महिन्यांत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.

किया सोनेट या यादीत ५ व्या क्रमांकावर होती, ज्यांच्या विक्रीत ६ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यापाठोपाठ टोयोटा अर्बन क्रूझर सहाव्या क्रमांकावर आहे. अर्बन क्रुझरच्या ६ हजार ७२४ वाहनांच्या विक्रीत १७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिंद्रा एक्सयुव्ही ३०० सातव्या क्रमांकावर आहे.

महिंद्रा थार ३ हजार ६१६ वाहन विक्री आणि १३ टक्के वाढीसह आठव्या क्रमांकावर आहे. महिंद्राच्या अनेक वाहनांसह, थारमध्येही दीर्घ प्रतीक्षा कालावधी आहे. उद्या कंपनीने त्यात सुधारणा केली तर ही एसयुव्ही या यादीत खूप वरवर राहू शकते. या यादीत ९ व्या क्रमांकावर निसान मॅग्नाइट आणि १० व्या क्रमांकावर रेनॉल्ट किगर आहे.

विभाग

पुढील बातम्या