मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tata-Airbus deal : एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा करार.. तब्बल २५० विमानं खरेदी करणार

Tata-Airbus deal : एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा करार.. तब्बल २५० विमानं खरेदी करणार

Feb 14, 2023, 09:00 PM IST

  • Air India-Airbus Deal : आज टाटा समूहाने एअर इंडियासाठी २५० विमाने खरेदी करण्याचा करार फ्रान्सच्या एअरबस कंपनीसोबत केला आहे. एअर इंडियाचा आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे सांगितले जात आहे.

Tata-Airbus deal

Air India-Airbus Deal : आज टाटा समूहाने एअर इंडियासाठी २५० विमाने खरेदी करण्याचा करार फ्रान्सच्या एअरबस कंपनीसोबत केला आहे. एअर इंडियाचा आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे सांगितले जात आहे.

  • Air India-Airbus Deal : आज टाटा समूहाने एअर इंडियासाठी २५० विमाने खरेदी करण्याचा करार फ्रान्सच्या एअरबस कंपनीसोबत केला आहे. एअर इंडियाचा आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे सांगितले जात आहे.

Air India-Airbus Deal : भारताच्या टाटा समूहाने एअर इंडिया एअर इंडियासाठी तब्बल २५० विमाने खरेदी करण्याचा फ्रान्सची कंपनी एअरबसशी ऐतिहासिक करार केला आहे. यामध्ये ४० जंबो आकाराच्या विमानांचा समावेश आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे. या करारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थितीत होते.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर टाटा ग्रुप आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या १७ वर्षात एअर इंडिया पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर विमान खरेदी करणार आहे. यापूर्वी २००५ मध्ये एअर इंडियाने १११ विमाने खरेदी केली होती. टाटा समूहाने मालकी घेतल्यानंतर एअर इंडियाचा हा पहिलाच करार आहे.

एअर इंडिया ४० मोठ्या आकाराची तर छोट्या आकाराची २१० विमानं खरेदी करणार आहे. यासंदर्भात ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला चंद्रशेखरन यांनी विमानांच्या खरेदीसाठी एअरबसशी करार पत्रावर स्वाक्षरी केली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही उपस्थित होते.

टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडियाचा मालकी हक्क घेतला होता. त्यानंतर एअर इंडियाचा विस्तार करण्यासाठी टाटा समूहाकडून वेगवेगळे उपाय केले जात आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आजच्या ऐतिहासिक करारासाठी एअर इंडिया आणि एअर बसचे अभिनंदन. हा महत्त्वाचा करार भारत आणि फ्रान्समधील घनिष्ठ संबंध तसेच भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील यश आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतो. भारताच्या'मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड'व्हिजन अंतर्गत एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत. 

पुढील बातम्या