मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लिंग बदलून पुरुष बनलेल्या तरुणाचे मैत्रिणीसोबत धक्कादायक कृत्य; पोलीसही चक्रावले!

लिंग बदलून पुरुष बनलेल्या तरुणाचे मैत्रिणीसोबत धक्कादायक कृत्य; पोलीसही चक्रावले!

Dec 25, 2023, 05:05 PM IST

  • Tamil Nadu Crime News : मैत्रिणीने लग्नास नकार दिला म्हणून लिंग बदलून पुरुष बनलेल्या एका पुरुषाने तिची हत्या केली.

Murder

Tamil Nadu Crime News : मैत्रिणीने लग्नास नकार दिला म्हणून लिंग बदलून पुरुष बनलेल्या एका पुरुषाने तिची हत्या केली.

  • Tamil Nadu Crime News : मैत्रिणीने लग्नास नकार दिला म्हणून लिंग बदलून पुरुष बनलेल्या एका पुरुषाने तिची हत्या केली.

Tamil Nadu Murder: लिंग बदलून पुरुष बनलेल्या एका तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवशीच तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना तामिळनाडू येथील आहे, जिथे मृत तरुणीला साखळीने बांधण्यात आले. त्यानंतर तिचा गळा कापून आणि त्यानंतर पेटवून देण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेला कारणीभूत असलेल्या वेत्रीमारण नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मृत तरुणीने आरोपीला लग्नास नकार दिल्याने ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वेत्रीमारण आणि मयत नंदिनी दोघेही शाळेय जीवनापासून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. वेत्रीमारणने एमबीएचे शिक्षण घेतले आहे, लिंग बदलण्यापूर्वी तिची ओळख पंदी मरुगेश्वरी अशी होती. लिंगबदलानंतर नंदिनीने वेत्रीमारणलासोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मात्र, त्यानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

शिक्षणानंतर नंदिनी चेन्नईला नोकरी करण्यासाठी गेली, जिथे ती नातेवाईकांसोबत राहत होती. वेत्रीमारण यांनी शनिवारी नंदिनीची भेट घेतली. दरम्यान, वेत्रीमारणने नंदिनीसाठी कपडे घेतले. यानंतर दोघेही तांबरम येथील एका अनाथ आश्रमात गेले आणि तेथे दान केले. वेत्रीमारणने नंदिनीला तिला घरी सोडतो असे सांगितले आणि वाटेत दोघेही पोनमार येथे थांबले. येथे बेत्रीमारणने नंदिनीला फोटो काढण्यास सांगितले, जिथे त्याने नंदिनीला बांधले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, वेत्रीमारणने नंदिनीला सोडण्यास नकार दिला आणि ब्लेडच्या सहाय्याने तिचा गळा चिरून तिचा हात कापला. एवढेच नाहीतर, त्याने नंदिनीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले आणि तेथून पळ काढला.

दरम्यान, नंदनीला जळलेल्या अवस्थेत पाहून काही लोकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वेत्रीमारणला रविवारी अटक केली. नंदिनीने लग्नास नकार दिल्यामुळे वेत्रीमारणने तिची हत्या केली, असे पोलिसांना सांगितले. वेत्रीमारणने नंदनीसाठी लिंग बदल केला होता. परंतु, नंदनीची तिच्या ऑफिसमधील एका तरुणासोबत जवळीक वाढली होती, याचाच राग डोक्यात ठेवून वेत्रीमारणने तिची हत्या केली.

पुढील बातम्या