मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देवाच्या कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना; क्रेन कोसळल्याने चौघांचा मृत्यू, ९ जण जखमी

देवाच्या कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना; क्रेन कोसळल्याने चौघांचा मृत्यू, ९ जण जखमी

Jan 23, 2023, 12:26 PM IST

  • Crane Accident: तामिळनाडूच्या अरक्कोनममधील कीलवेठी येथे देवाच्या कार्यक्रमादरम्यान क्रेन कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ९ जण जखमी झाल्याची माहिती, राणीपेटचे जिल्हाधिकाऱ्याने दिली आहे.

Tamil Nadu Crane Accident

Crane Accident: तामिळनाडूच्या अरक्कोनममधील कीलवेठी येथे देवाच्या कार्यक्रमादरम्यान क्रेन कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ९ जण जखमी झाल्याची माहिती, राणीपेटचे जिल्हाधिकाऱ्याने दिली आहे.

  • Crane Accident: तामिळनाडूच्या अरक्कोनममधील कीलवेठी येथे देवाच्या कार्यक्रमादरम्यान क्रेन कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ९ जण जखमी झाल्याची माहिती, राणीपेटचे जिल्हाधिकाऱ्याने दिली आहे.

Tamil Nadu: तामिळनाडूच्या अरक्कोनममधील कीलवेठी येथे रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. मंदीर उत्सवाच्या एका कार्यक्रमादरम्यान क्रेन कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, ९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जमखींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी क्रेन ऑपरेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

तामिळनाडूच्या कीलवेठीगावातील द्रौपती मंदिरात द्रौपती अम्मान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.पोंगलनंतरचा हा पारंपारिक उत्सव दरवर्षी अरक्कोनम जवळील ‘द्रौपती’ आणि ‘मंदिअम्मन’ मंदिरांमध्ये आयोजित केला जातो. याच कार्यक्रमादरम्यान रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास क्रेन कोसळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकाचा आज सकाळी उपचारदरम्यान मृत्यू झाला. जखमी झालेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

राणीपेटचे जिल्हाधिकारी भास्कर पांडियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराच्या उत्सवात क्रेन वापरण्यासाठी कोणतीही परवानगी किंवा सूचना नव्हती. हे एक खाजगी मंदिर आहे. येथे दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु, यावर्षी देवाला हार घालण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे."

विभाग

पुढील बातम्या