मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Syphilis Disease : सेक्स केल्यानं पसरतोय घातक सिफलिस आजार; युरोपमध्ये वेश्याव्यवसाय बंद

Syphilis Disease : सेक्स केल्यानं पसरतोय घातक सिफलिस आजार; युरोपमध्ये वेश्याव्यवसाय बंद

Sep 29, 2022, 12:51 PM IST

    • Syphilis Disease In Europe : युरोपमध्ये सध्या सिफलिस आजाराचे रुग्ण सापडत असल्यानं अनेक वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी काम बंद केलं आहे.
Syphilis Disease In Europe (HT)

Syphilis Disease In Europe : युरोपमध्ये सध्या सिफलिस आजाराचे रुग्ण सापडत असल्यानं अनेक वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी काम बंद केलं आहे.

    • Syphilis Disease In Europe : युरोपमध्ये सध्या सिफलिस आजाराचे रुग्ण सापडत असल्यानं अनेक वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी काम बंद केलं आहे.

Syphilis Disease In Europe : इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्ससह संपूर्ण युरोपमध्ये सध्या मोठ्या संख्येनं सिफलिस आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं युरोपीय देशांमध्ये खळबळ उडाली असून वेश्याव्यसाय करणाऱ्या हजारो महिलांनी काम थांबवलं आहे. सिफलिस हा एड्ससारखाच घातक आजार असून त्याचं शारीरिक संबंधातून संक्रमण होत असल्याचं समोर आल्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळं आता या आजारावर मात करण्यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न सुरू झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

काय आहे सिफलिस आजार?

सिफलिस हा एक बॅक्टिरेयल इन्फेक्शन आहे, जो शारीरिक संबंधातून लोकांमध्ये पसरत आहे. सिफलिस आजार झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात ट्रॅपोनेमा पॅलिडम नावाचा विषाणू तयार होतो, त्यानंतर संपूर्ण शरीराला खाज यायला सुरुवात होते. त्यानंतर विषाणू शरीरातील इतर अवयवांना डॅमेज करण्याचं काम करतो. हा आजार अनेक गर्भवती महिलांना झाल्यानं त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही युरोपमध्ये समोर आलेल्या आहेत. त्यामुळं आता लोक या आजाराच्या भीतीनं सेक्स करणं टाळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या या आजारामुळं युरोपात अनेक वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी काम करणं थांबवलं आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांना सिफलिस हा आजार होण्याची संभावना अधिक असल्यानं त्यांनी याबाबतची तपासणी करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान कोरोना महामारीच्या काळात कोविड-१९ या विषाणूनं इंग्लंडसह जर्मनी आणि स्पेनमध्ये धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळं युरोपात लाखो लोकांचा जीव गेला होता. त्यानंतर आता सिफलिस या नव्या आजाराचे रुग्ण युरोपातील अनेक देशांमध्ये सापडायला लागल्यानं चिंता वाढल्या आहेत.

विभाग

पुढील बातम्या