मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sukhoi 30 and Mirage 2000 crash in MP : हवाई दलाचे सुखोई आणि मिराज विमान कोसळले; एकाच दिवशी तीन अपघात

Sukhoi 30 and Mirage 2000 crash in MP : हवाई दलाचे सुखोई आणि मिराज विमान कोसळले; एकाच दिवशी तीन अपघात

Jan 28, 2023, 12:42 PM IST

    • Sukhoi 30 and Mirage 2000 crash in MP : मध्य प्रदेशात मुरैनाजवळ एक दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे सुखोई ३० आणि मिराज २००० हे विमान कोसळले आहे. तिसरा अपघात हा राजस्थान येथील भरतपुर येथे घडला आहे.
Sukhoi 30 and Mirage 2000 crash in MP

Sukhoi 30 and Mirage 2000 crash in MP : मध्य प्रदेशात मुरैनाजवळ एक दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे सुखोई ३० आणि मिराज २००० हे विमान कोसळले आहे. तिसरा अपघात हा राजस्थान येथील भरतपुर येथे घडला आहे.

    • Sukhoi 30 and Mirage 2000 crash in MP : मध्य प्रदेशात मुरैनाजवळ एक दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे सुखोई ३० आणि मिराज २००० हे विमान कोसळले आहे. तिसरा अपघात हा राजस्थान येथील भरतपुर येथे घडला आहे.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ शनिवारी सकाळी सुखोई-३० आणि मिराज २००० विमानांचा अपघात झाला. ही दोन्ही विमाने हवेत धडकली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. या ठिकाणी नेहमी प्रमाणे या विमानांचा सराव सुरू होता. सरायवा दरम्यान ही दोन्ही विमाने हवेत एकमेकांना धडकली अशी प्राथमिक माहिती आहे.

अपघाताच्या वेळी सुखोई विमानात दोन पायलट होते तर मिराज २०००० मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. भारतीय वायुसेनेचे (IAF) हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले आहे. तिसरा पायलटदेखील सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ही हवाई धडक होती की नाही, तसेच ही दुर्घटना कशी झाली या बाबत हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. या समितिच्या अहवालानंतर अपघाताचे कारण कळू शकणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना हवाई दलाच्या प्रमुखांनी या अपघाताबाबत माहिती दिली.

राजस्थानच्या भरतपुर येथून एक मोठी बातमी येत आहे. भरतपुर येथील पिंगोरी रेल्वे स्थानकाजवळ एक चार्टर विमान कोसळले आहे. या बाबतचे वृत एएनआयने दिले आहे. आज सकाळी १० च्या सुमारास एक विमान भरतपुर येथील पिंगोरी रेल्वे स्थानकाजवळ कोसळले. हे विमान चार्टर विमान असल्याची माहिती मिळत आहे. या अपघात किती मृत्यू झाले याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, भरतपुरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी हा अपघात झाला असल्याचे सांगितले आहे. हे विमान हवाई दलाचे आणि की खासगी आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

पुढील बातम्या