मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bastille Day Parade : परभणीच्या पठ्ठ्याचा फ्रान्समध्ये पराक्रम; बॅस्टिल परेडमध्ये घेतला सहभाग घेत रचला इतिहास

Bastille Day Parade : परभणीच्या पठ्ठ्याचा फ्रान्समध्ये पराक्रम; बॅस्टिल परेडमध्ये घेतला सहभाग घेत रचला इतिहास

Jul 15, 2023, 07:55 AM IST

    • Squadron Leader Sushil Shinde : स्क्वॉड्रन लीडर सुशील शिंदे यांचे वडील एसटी महामंडळात नोकरीला होते. मुलाने फ्रान्समध्ये इतिहास रचल्याचा प्रसंग त्यांनी टीव्हीवर पाहिला आहे.
Squadron Leader Sushil Shinde In Bastille Day Parade (HT)

Squadron Leader Sushil Shinde : स्क्वॉड्रन लीडर सुशील शिंदे यांचे वडील एसटी महामंडळात नोकरीला होते. मुलाने फ्रान्समध्ये इतिहास रचल्याचा प्रसंग त्यांनी टीव्हीवर पाहिला आहे.

    • Squadron Leader Sushil Shinde : स्क्वॉड्रन लीडर सुशील शिंदे यांचे वडील एसटी महामंडळात नोकरीला होते. मुलाने फ्रान्समध्ये इतिहास रचल्याचा प्रसंग त्यांनी टीव्हीवर पाहिला आहे.

Squadron Leader Sushil Shinde In Bastille Day Parade : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय फ्रान्स या देशाच्या दौऱ्यावर गेले आहे. यावेळी पीएम मोदी यांचं फ्रेंच राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी जंगी स्वागत केलं आहे. पीएम मोदी यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या राष्ट्रीय दिनाला हजेरी लावली आहे. त्यानंतर ऐतिहासिक बॅस्टिल डे परेड कार्यक्रमात पीएम मोदींनी हजेरी लावत दोन्ही देशातील संबंध दृढ करण्याचे संकेत दिले आहे. भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमानं खरेदी केली आहे. याशिवाय आणखी काही विमानांची ऑर्डर फ्रान्सला देण्यात आली आहे. राफेल विमानांची पहिली तुकडी लवकरच भारतीय सैन्यात दाखल होणार आहे. बॅस्टिल डे परेड कार्यक्रमात परभणीचे सुपूत्र आणि स्क्वॉड्रन लीडर सुशील शिंदे यांनी भारतीय हवाई दलाच्या टीमचं नेतृत्व केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

स्क्वॉड्रन लीडर सुशील शिंदे हे मूळचे परभमीच्या पूर्णा येथील आहे. त्यांचे वडील शंकर शिंदे हे एसटी महामंडळात नोकरीला होते. शंकर शिंदे यांनी मुलाला राफेल विमानांच्या टीमचं नेतृत्व करताना टीव्हीवर पाहिलं आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. तसेच त्यांनी मुलाच्या कष्टाचीही दाद दिली आहे. सुशील शिंदे हे साताऱ्यातील सैनिकी स्कूलचे माजी विद्यार्थी असून लहानपणापासूनच त्यांनी पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यांची बहिण आयएएफ अधिकारी आहे. केंद्रातील मोदी सरकारने फ्रान्सकडून राफेल विमानांची ऑर्डर दिल्यानंतर सुशील शिंदे हे अनेकदा युरोप तसेच फ्रान्समध्ये गेले होते. बॅस्टिल डे परेडमध्ये भारतीय हवाई सेवेच्या तुकडीने भाग घेतला. भारतीय हवाई दलाची तीन राफेल लढाऊ विमाने फ्रेंच विमानांसह फ्लायपास्टमध्ये सामील झाली. परेडमध्ये भारतीय तुकडीचं नेतृत्व सुशील शिंदे यांनी केलं.

मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान असताना फ्रान्सला पहिल्यांदाच १०६ राफेल लढाऊ विमानांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर केंद्रात सत्ताबदल होताच मोदी सरकारने पहिल्या टप्प्यात ३६ विमानांची ऑर्डर दिली. येत्या काही वर्षात भारताला आणखी विमानं फ्रान्सकडून मिळणार आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं होतं. कोर्टाने राफेल विमान खरेदी प्रकरणातील महत्त्वपूर्ण आणि गोपनीय कागदपत्रं मागवली होती. त्यानंतर आता फ्रान्सकडून राफेल विमानांची पहिली तुकडी येत्या काही दिवसांत भारतात दाखल होणार आहे. त्यानंतर राफेल विमान भारतीय हवाई दलात सामील होणार आहे.

पुढील बातम्या