मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ..तर आम्हाला दक्षिण भारताला वेगळा देश बनवावा लागेल; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपचा हल्ला

..तर आम्हाला दक्षिण भारताला वेगळा देश बनवावा लागेल; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपचा हल्ला

Feb 01, 2024, 08:39 PM IST

  • South Indian States : केंद्र सरकारकडून विकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारताकडे वळवला जात आहे. सरकार सर्व बाबतीत आमच्याशी चुकीचे वागत असल्याचा आरोप सुरेश यांनी केला.

congress mp dk suresh 

South Indian States : केंद्र सरकारकडूनविकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारताकडे वळवला जात आहे. सरकारसर्व बाबतीत आमच्याशी चुकीचे वागत असल्याचा आरोपसुरेश यांनी केला.

  • South Indian States : केंद्र सरकारकडून विकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारताकडे वळवला जात आहे. सरकार सर्व बाबतीत आमच्याशी चुकीचे वागत असल्याचा आरोप सुरेश यांनी केला.

काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांचे खासदार भाऊ डीके सुरेश यांनी गुरुवारी उत्तर आणि दक्षिण भारताबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. डीके सुरेश यांनी आरोप केला आहे की, कर्नाटकला केंद्र सरकार निधी पुरवठा करत नाही. यामुळे दक्षिण भारताला वेगळा देश करण्याची मागणी करण्यावाचून त्यांच्याकडे अन्य पर्याय दिसत नाही. डीके सुरेश यांच्या वक्तव्यानंतर भाजपने जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसवर फोडा व राज्य करा नितीचा अवलंब करत असल्याचा आरोप केला.

ट्रेंडिंग न्यूज

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना डीके सुरेश यांनी हे वक्तव्य केले आहे. केंद्राने आम्हाला जे पैसे देणे बाकी आहेत ते जरी आम्हाला दिले तर ते पुरेसे होईल. जीएसटी म्हणून जमा केलेले कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. दक्षिण भारतासोबत खूप चुकीचे घडतेय हे आम्ही पाहत आहोत, असा आरोप सुरेश यांनी केला. कर्नाटक देशाला मोठ्या प्रमाणात महसूल देत असून त्याचा परतावा केंद्रकडून होत नाही. 

केंद्र सरकारकडून विकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारताकडे वळवला जात आहे. सरकार सर्व बाबतीत आमच्याशी चुकीचे वागत असल्याचा आरोप सुरेश यांनी केला. याचबरोबर आपण जर याचा विरोध केला नाही तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल. हिंदी राज्ये दक्षिण भारताला तोडण्यासाठी आम्हाला भाग पाडत आहेत, असे सुरेश म्हणाले.

केंद्राला आमच्याकडून ४ लाख कोटीहून अधिक महसूल मिळतो मात्र त्याबदल्यात आम्हाला मिळणारा परताना नगण्य आहे. यावर आवाज उठवाला लागेल. नाहीतर आम्हाला दक्षिणी राज्यांचा एक वेगळा राष्ट्राची मागणी करावी लागेल. 

डीके सुरेश यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर लिहिले आहे की, एकीकडे त्यांचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत देशाला एकजूट करण्याचा प्रयत्न करत असताना आमचे खासदार देश तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कर्नाटकची जनता हे होऊ देणार नाही व लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगला धडा शिकवेल.

पुढील बातम्या