मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  sonia gandhi vs smriti irani: सोनिया गांधी स्मृती ईराणींवर का भडकल्या?

sonia gandhi vs smriti irani: सोनिया गांधी स्मृती ईराणींवर का भडकल्या?

Jul 28, 2022, 04:33 PM IST

    • sonia gandhi vs smriti irani: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत केलेल्या चुकीच्या विधानानंतर संसदेत गदारोळ झाला. यानंतर संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात वाद झाल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सोनिया गांधी स्मृती इराणींवर भडकल्या (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

sonia gandhi vs smriti irani: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत केलेल्या चुकीच्या विधानानंतर संसदेत गदारोळ झाला. यानंतर संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात वाद झाल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

    • sonia gandhi vs smriti irani: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत केलेल्या चुकीच्या विधानानंतर संसदेत गदारोळ झाला. यानंतर संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात वाद झाल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sonia Gandhi vs Smriti Irani: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (adhir ranjan chowdhury) यांच्या वक्तव्यामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात खटके उडाल्याची चर्चा आता सुरू आहे. अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचं सांगण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भाजप खासदार रमा देवी यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन महिला खासदार होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

सोनिया गांधी यांनी भाजप खासदार रमा देवी यांना अधीर रंजन यांनी आधीच माफी मागीतली आहे. यात माझा दोष आहे काय? असा प्रश्न विचारला. तेव्हाच स्मृती इराणी यांनी मधे बोलण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की,"मॅडम, मी मदत करू का? मी तुचं नाव घेतलं होतं." यावर सोनिया गांधी यांनी माझ्याशी बोलू नका असं सुनावलं.

सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात झालेल्या या शाब्दिक वादावर काँग्रेस नेत्याने सांगितलं की, सोनिया गांधी या रमा देवी यांच्याशी शांतपणे बोलत होत्या. त्यावेळी स्मृती इराणी तिथे येत सोनिया गांधी यांच्या दिशेनं बोट दाखवलं. "तुम्ही धाडसच कसं केलंत, असं वागू नका. हे तुमचं पक्षाचं कार्यालय नाही." असं स्मृती इराणी म्हणाल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे. स्मृती इराणी मधेच बोलल्यानंतर सोनिया गांधी या "मी तुमच्याशी बोलत नाही" असं म्हणत ओरडल्या. त्यामुळं तणाव वाढला.

सोनिया गांधी यांनी स्मृती इराणींसोबत झालेल्या या वादावर बोलताना असंही सांगितलं की, "मी फक्त रमा देवी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मी त्यांना ओळखते. मी घाबरले नव्हते. मी रमा देवींना ओळखत असल्याने त्यांना अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितलीय आणि माझ्यावर का हल्ले करताय इतकंच सांगायचं होतं."

सोनिया गांधींनी आमच्या महिला खासदाराशी बोलणं केलं तेव्हा इतर खासदार तिथे येऊन काय झालं, काय चाललंय असं विचारलं. त्यावेळी तुम्ही माझ्याशी बोलू नका असं मोठ्या आवाजात, धमकीच्या सुरात सोनिया गांधींनी इतर खासदारांना दम दिला असा आरोप केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांनी केला.

दरम्यान, संसदेत या गोंधळावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, अपरुपा पोद्दार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सोनिया गांधींना भाजप खासदारांपासून दूर नेताना दिसल्या. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

पुढील बातम्या