मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Social Media : कंपनीनं कर्मचारी कपात केल्यानं ढसाढसा रडला CEO; व्हायरल फोटोची होतेय चर्चा!

Social Media : कंपनीनं कर्मचारी कपात केल्यानं ढसाढसा रडला CEO; व्हायरल फोटोची होतेय चर्चा!

Aug 11, 2022, 11:55 AM IST

    • Social Media Viral Selfie : कोरोनाकाळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं होतं. परंतु आता एका कंपनीनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं सीईओला अश्रू अनावर झाले आहे.
Social Media Viral Selfie Of CEO Braden Wallake (HT)

Social Media Viral Selfie : कोरोनाकाळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं होतं. परंतु आता एका कंपनीनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं सीईओला अश्रू अनावर झाले आहे.

    • Social Media Viral Selfie : कोरोनाकाळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं होतं. परंतु आता एका कंपनीनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं सीईओला अश्रू अनावर झाले आहे.

Social Media Viral Selfie Of CEO Braden Wallake : कोणत्याही कंपनीत कर्मचारी कपात करणं किंवा काही नोकरदारांना कामावरून काढून टाकणं ही गोष्ट काही नवीन नाही. कोरोना महामारीत जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. परंतु आता एका कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्यानं सीईओ ढसाढसा रडला आहे. कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय हा वेदना देणारा असल्यानं त्यानं रडू येतानाचा एक फोटो पोस्ट केला असून आता तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

मिळालेल्या माहितीनुसार, हाइपरसोशल कंपनीचे सीईओ असलेल्या ब्रॅडेन वालेक यांचा हा फोटो असून त्यांनी हा फोटो पोस्ट करताना त्यांच्या भावनाही शेयर केल्या आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांना कर्मचाऱ्यांना का काढावं लागतंय किवा कोणत्या स्थितीत त्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला, याबाबत त्यांनी सांगितलं आहे. आता यावरून सीईओ ब्रॅडेन यांचं काही लोक कौतुक करत आहेत तर काही लोकांनी त्यांच्या टीका केली आहे.

कर्मचाऱ्यांना काढल्याचा निर्णय घेतल्यानं रडू कोसळल्याचा फोटो शेयर करत हायपरसोशल कंपनीचे सीईओ ब्रॅडेन यांनी म्हटलं आहे की, माझ्यासाठी ही सर्वात कठीण गोष्ट आहे, ज्याला माझी कधीही शेयर करण्याची इच्छा नसणार आहे, मी गेल्या काही आठवड्यांपूर्वी लिंक्डिनवर अनेक कंपन्यांनी केलेल्या कर्मचारी कपातीच्या पोस्ट पाहिलेल्या आहेत, त्यातून सध्याच्या अर्थव्यवस्थेची होणारी पडझड हे एक महत्त्वाचं कारण आहे, मी फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळं आता कंपनी डबघाईस आली आहे, मी लोकांना सांगू इच्छितो की प्रत्येक सीईओ हा पैशांचाच विचार करत नाही, मी जर कंपनीचा मालक असतो, तर हे होऊ दिलं नसतं, असं म्हणत सीईओ ब्रॅडेन यांनी कर्मचाऱ्यांना कपात करण्याच्या निर्णयावर दुख: व्यक्त केलं आहे.

सीईओ ब्रॅडेन यांनी शेयर केलेल्या फोटोवर आता काही लोक 'क्राईंग सेल्फी' अशी कमेंट्स करू लागले आहे. तर काही लोकांनी त्यांच्या प्रामाणितकपणाचं कौतुक केलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोकांनी त्यावर मत व्यक्त केलं आहे.

विभाग

पुढील बातम्या