मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral video: विमानाच्या ओव्हरहेड केबिनमध्ये आढळला जिवंत साप; प्रवाशांची उडाली तारांबळ

Viral video: विमानाच्या ओव्हरहेड केबिनमध्ये आढळला जिवंत साप; प्रवाशांची उडाली तारांबळ

Jan 19, 2024, 06:04 PM IST

  • विमानाच्या आत ओव्हरहेड केबिनमध्ये जिवंत साप आढळल्याची घटना थायलंडमध्ये घडली आहे. जिवंत साप दिसल्याने विमानातील प्रवाशांमध्ये काही वेळ घबराट निर्माण झाली होती.

The incident took place on a flight from Bangkok to Phuket on January 13. (X)

विमानाच्या आत ओव्हरहेड केबिनमध्ये जिवंत साप आढळल्याची घटना थायलंडमध्ये घडली आहे. जिवंत साप दिसल्याने विमानातील प्रवाशांमध्ये काही वेळ घबराट निर्माण झाली होती.

  • विमानाच्या आत ओव्हरहेड केबिनमध्ये जिवंत साप आढळल्याची घटना थायलंडमध्ये घडली आहे. जिवंत साप दिसल्याने विमानातील प्रवाशांमध्ये काही वेळ घबराट निर्माण झाली होती.

थायलंडमध्ये विमानाच्या आत ओव्हरहेड केबिनमध्ये जिवंत साप आढळल्याची घटना घडली आहे. थायलंडमधील एअर एशिया या विमान कंपनीचे प्रवासी विमान राजधानी बँकॉकहून फुकेट शहराकडे उड्डाण करणार होते. विमान उड्डाण करण्यास तयार असताना एका प्रवाशाला विमानाच्या ओव्हरहेड केबिनवरून साप सरपटताना जात असल्याचे दिसून आले. विमानातील अनेक प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइल फोनमध्ये कैद केला. विमानातील एक कर्मचारी पाण्याच्या बाटलीने सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसून येतो. एका 'X' (पूर्वीचे twitter) युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. #Bangkok फुकेटला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानात प्रवाशांना ओव्हरहेड केबिनच्या वरच्या बाजूने एक साप रेंगाळताना दिसला.' अशी पोस्ट या यूजरने शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

दरम्यान, या घटनेनंततर एअर एशिया, थायलंडने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'बँकॉकमधील डॉन मुआंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३ जानेवारी रोजी निघालेल्या एफडी ३०१५ या विमानात साप दिसण्याची घडना घडली होती. या घटनेची आम्हाला माहिती आहे.' असं या निवेदनात म्हटले आहे.

फुकेटला विमान उतरल्यानंतर संबंधित अभियांत्रिकी आणि सुरक्षा पथकांनी तातडीने विमानाची तपासणी केली. मात्र, त्यानंतर सापाचे काय झाले, याचा कोणताही उल्लेख या निवेदनात करण्यात आलेला नाही.

विमानात साप दिसणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. अशी घटना हाताळण्यासाठी फ्लाइट अटेंडंटना प्रशिक्षण दिलेले आहे असे एअर एशिया एअरलाइन्सचे कॉर्पोरेट सेफ्टी प्रमुख फॉल पुम्पुआंग यांनी सांगितले.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, फुकेटमध्ये उतरण्यापूर्वी एका प्रवाशाला ओव्हरहेड लगेज केबिनवर एक छोटा साप दिसल्यानंतर फ्लाइट अटेंडंटना कळविण्यात आले होते. एअर एशियाच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची घटना हाताळण्यासाठी चांगले प्रशिक्षण दिलेले असते. विमान कर्मचाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील प्रवाशांना स्थलांतरित केले होते.

एअर एशियाच्या विमानात दुसऱ्यांदा दिसला साप

यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये मलेशियाची राजधानी क्वालालंपूरहून सबाह शहराकडे जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानामध्ये एक अजगर आढळला होता. अजगर दिसल्यानंतर हे विमान पुन्हा कुचिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले होते, असं वृत्त सीएनएनने दिले आहे.

पुढील बातम्या