मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Morena Firing : एकाच कुटुंबातील सहा जणांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, धक्कादायक घटनेने मध्यप्रदेश हादरलं

Morena Firing : एकाच कुटुंबातील सहा जणांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, धक्कादायक घटनेने मध्यप्रदेश हादरलं

May 05, 2023, 03:55 PM IST

    • Morena Crime News : जमिनीच्या वादातून आरोपीने एकाच कुटुंबातील सहा जणांना गोळ्या घालून संपवल्याची घटना समोर आली आहे.
Morena Crime News Marathi (HT_PRINT)

Morena Crime News : जमिनीच्या वादातून आरोपीने एकाच कुटुंबातील सहा जणांना गोळ्या घालून संपवल्याची घटना समोर आली आहे.

    • Morena Crime News : जमिनीच्या वादातून आरोपीने एकाच कुटुंबातील सहा जणांना गोळ्या घालून संपवल्याची घटना समोर आली आहे.

Morena Madhya Pradesh Crime News Marathi : जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातल्या भिडोसा गावात ही घटना घडली आहे. भिडोसातील दोन कुटुंबात गेल्या दहा वर्षांपासून जमिनीवरून वाद होत होता. परंतु शुक्रवारी सकाळी पुन्हा वाद झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर एका आरोपीने रायफलीने सहा जणांनी गोळ्या घालून हत्या केली. मृतांमध्ये एका कुटुंबातील तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात आरोपी लोकांवर गोळीबार करत स्पष्ट असल्याचं दिसून येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मुरैनात जिल्ह्यातल्या भिडोसा गावात गेल्या दहा वर्षांपासून दोन कुटुंबात संपत्तीवरून वाद होत होता. शुक्रवारी याच कारणावरून दोन्ही कुटुंबांत पुन्हा वाद झाला. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील पुरुषांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाली. त्यानंतर एका व्यक्तीने घरातील रायफल बाहेर काढून थेट लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. आरोपीने तीन महिला आणि तीन पुरुषांवर एक-एक करून गोळ्या घालून त्यांना ठार केलं. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच मुरैना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

मध्यप्रदेशातील मुरैना जिल्हा गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध मानला जातो. कुख्यात दरोडेखोर पानसिंग तोमर आणि फुलन देवी याच जिल्ह्यातून येतात. मुरैनातील चंबळमध्ये अनेक दरोडेखोर आणि कुख्यात आरोपींच्या लपण्याचं घर मानलं जातं. भिडोसा गावापासून चंबळ काही किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळं आता गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या मुरैना जिल्ह्यात पुन्हा हत्याकांडाची घटना समोर आल्यामुळं मध्यप्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पुढील बातम्या