मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sharad Pawar Gautam Adani : शरद पवार-गौतम अदानींची अहमदाबादमध्ये भेट; दोघांत अर्धा तास खलबतं, चर्चांना उधाण

Sharad Pawar Gautam Adani : शरद पवार-गौतम अदानींची अहमदाबादमध्ये भेट; दोघांत अर्धा तास खलबतं, चर्चांना उधाण

Sep 23, 2023, 11:13 PM IST

  • Sharad Pawar Meet Gautam Adani : शरद पवार यांनी उद्योपती गौतम अदानी यांची अहमदाबाद भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. गौतम अदानी यांच्या यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

Sharad Pawar Gautam Adani Meet

Sharad Pawar Meet Gautam Adani : शरद पवार यांनीउद्योपती गौतम अदानी यांची अहमदाबाद भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. गौतम अदानी यांच्या यांच्या निवासस्थानीही भेट झाली.

  • Sharad Pawar Meet Gautam Adani : शरद पवार यांनी उद्योपती गौतम अदानी यांची अहमदाबाद भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. गौतम अदानी यांच्या यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

Sharad Pawar Meet Gautam Adani in Ahmedabad : संसदेच्या विशेष अधिवेशना दरम्यान शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यातील भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकारणात खळबळ माजली असताना आता शरद पवार यांनी उद्योपती गौतम अदानी यांची अहमदाबाद भेट घेतल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. गौतम अदानी यांच्या यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. तसेच दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

शरद पवार आणि गौतम अदानी यांची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी भेट असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वीही पवार-अदानी यांची भेट झाली आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची २० एप्रिल २०२३ ला मुंबईत भेट झाली होती. या दोघांची २ जून २०२३ रोजी दुसऱ्यांदा भेट झाली होती. 

 शरद पवार एका खाजगी कार्यक्रमासाठी गुजरातला गेले होते, असे सांगितले जात आहे. त्यावेळी शरद पवार यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पुण्यातील एका उद्योगपतीच्या अहमदाबादमधील  फॅक्टरी उद्घाटनासाठी शरद पवार आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

या भेटीबाबत आमदार रोहित पवार यांनी म्हटले की, शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल, त्यात वेगळे काय आहे. शरद पवार हे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पॉलिसी ठरत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय उद्योग व विकासाच्या पॉलिसी करता येत नाहीत.

पुढील बातम्या