मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Seema Haider : सीमा हैदर उतरणार लोकसभेच्या रिंगणात! २०२४ च्या निवडणुकीसाठी NDA कडून मिळाली ऑफर

Seema Haider : सीमा हैदर उतरणार लोकसभेच्या रिंगणात! २०२४ च्या निवडणुकीसाठी NDA कडून मिळाली ऑफर

Aug 03, 2023, 05:23 PM IST

  • Seema Haider in 2024 election: प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमधून  भारतात आलेल्या सीमा हैदर २०२४ मध्ये  लोकसभा निवडणूक लढू शकते. रिपोर्टनुसार सीमा हैदरला एनडीएचा सहयोगी पक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून ऑफर मिळाली आहे.

Seema haider

Seema Haider in 2024 election: प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढू शकते. रिपोर्टनुसारसीमाहैदरलाएनडीएचा सहयोगी पक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदासआठवले यांचा पक्षरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडूनऑफर मिळाली आहे.

  • Seema Haider in 2024 election: प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमधून  भारतात आलेल्या सीमा हैदर २०२४ मध्ये  लोकसभा निवडणूक लढू शकते. रिपोर्टनुसार सीमा हैदरला एनडीएचा सहयोगी पक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून ऑफर मिळाली आहे.

Seema Haider in 2024 election : पाकिस्तानमधून आपल्या पबजी प्रियकरासाठी चार मुलांसोबत भारतात आलेल्यासीमा हैदर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाली आहे. सीमा हैदर नोएडामध्ये आपला प्रियकर सचिन मीणा याच्यासोबत रहात आहे. सीमावर पाकिस्तानी हेर असल्याचाही आरोप करण्यात आला. कोणी प्रेमवेडी म्हटले तर अनेकांनी तिच्यावर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप केला. आता बातमी आली आहे की, सीमा हैदर २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढू शकते. रिपोर्टनुसार सीमा हैदरला एनडीएचा सहयोगी पक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडूनऑफर मिळाली आहे. आता माहिती मिळत आहे की, सीमा हैदर हिने प्रपोजल स्वीकार केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानला गेलेल्या अंजूची कहाणी दोन्ही देशातील अबालवृद्धांच्या तोंडी आहे. एकीकडे अंजूवर प्रेमाचा असा रंग चढला की, ती पती व दोन मुलांना सोडून आपल्या फेसबुक प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली व तेथे ती फातिमा बनली. तेथे तिच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. तिला नोकरीच्या ऑफर मिळत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदरही सेलेब्रेटी बनली आहे. काही दिवसापूर्वी सीमा आणि सचिन मीणा यांना नोकरीची ऑफर मिळली होती त्याचबरोबर सीमाला चित्रपटासाठी रोलही ऑफर झाला होता.

आता चर्चा आहे की, सीमा हैदर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते. सीमा हैदरला एनडीएचा सहयोगी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून उमेदवारीची ऑफर मिळाली आहे. दुसरीकडे सीमाने पक्षाचा हा प्रस्ताव स्वीकार केला आहे.

 

पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी सांगितले की,सीमा हैदरला पक्षाकडून ऑफर देण्यात आली आहे. तिला महिला संघटनेचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. तिच्याकडे संवाद साधण्याची उत्तम कला आहे. त्यामुळे तिला पक्षाचे प्रवक्तेपदही दिले जाऊ शकते. त्याचबरोबर असेही सांगितले की, तपास एजन्सीजकडून तिला क्लीन चिट मिळण्याची प्रतीक्षा आहे, त्यानंतर हा निर्णय सार्वजनिक केला जाईल.

विभाग

पुढील बातम्या