मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांविषयी केलेल्या विधानामुळं राजकारण तापलं! शिंदेंच्या भूमिकेकडं लक्ष

चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांविषयी केलेल्या विधानामुळं राजकारण तापलं! शिंदेंच्या भूमिकेकडं लक्ष

Apr 11, 2023, 01:51 PM IST

  • Sanjay Raut on Chandrakant Patil : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळं एकनाथ शिंदे गटाची कोंडी झाली आहे.

Balasaheb Thackeray

Sanjay Raut on Chandrakant Patil : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळं एकनाथ शिंदे गटाची कोंडी झाली आहे.

  • Sanjay Raut on Chandrakant Patil : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळं एकनाथ शिंदे गटाची कोंडी झाली आहे.

Chandrakant Patil on Babri Masjid : अयोध्येतील बाबरी मशीद पतनाच्या संदर्भात भाजपचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळं राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजप व शिंदे गटावर तुफान हल्ला चढवला आहे. पळपुटे भाजपवाले बाळासाहेबांबद्दल खोटं पसरवत असताना मिंधे गप्प का आहेत, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

बाबरी पतनाच्या घटनेशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. तिथं ना शिवसैनिक होते, ना बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेबांनी केवळ जबाबदारी घेतली होती, पण एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता. मी स्वत: तिथं होतो, त्यामुळं मला माहीत आहे. तिथं बजरंग दलाचे लोक होते. कारसेवक होते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरून राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

'बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी जो त्याग केला, त्यातूनच आज भाजपला हे दिवस दिसले आहेत. पण बाबरी पतनाच्या इतिहासातून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न भाजप करतोय. चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भाजपच बोलतो आहे. पाटील हे अत्यंत कुचेष्ठेनं तसं बोलले आहेत. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेबांचं नावच पुसायचं आहे.'बाबरी पडली तेव्हा भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी स्वत: वक्तव्य केलं होतं की भाजपचा यात हात नाही. तेव्हा पळून गेलेले आता इतक्या वर्षांनंतर भाजपचे लोक श्रेय घ्यायला निघालेत, असं राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील आणि भाजपवाले जे काही बोलतायत, त्यावर लाचार शिंदे गट का गप्प आहे? स्वत:ला खरे शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे वारस म्हणवणाऱ्यांनी तोंडाला कुलूप का लावलं आहे? बाळासाहेबांच्या या अपमानाचा निषेध म्हणून ते सत्ता सोडणार आहेत का? मिंधे काय बोलतात याकडं महाराष्ट्राचं लक्ष आहे. खरंतर त्यांनी राजीनामे द्यायला हवेत. आहे हिंमत तुमच्याकडं? नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला. राऊत यांच्या या भूमिकेमुळं आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.

पुढील बातम्या