मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Russia Ukraine War: तिसऱ्या महायुद्धाला फुटणार तोंड? यूक्रेनकडून युद्धात उतरला ब्रिटन!

Russia Ukraine War: तिसऱ्या महायुद्धाला फुटणार तोंड? यूक्रेनकडून युद्धात उतरला ब्रिटन!

Nov 03, 2022, 05:11 PM IST

    • रशियाने गुरुवारी ब्रिटनच्या राजदूताला बोलावून निषेध व्यक्त केला. रशियाने असा दावा केला आहे की,  क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटवर युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे कर्मचारी सहभागी होते. 
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटणार?

रशियाने गुरुवारी ब्रिटनच्या राजदूताला बोलावून निषेध व्यक्त केला. रशियानेअसा दावा केला आहे की, क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटवर युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे कर्मचारी सहभागी होते.

    • रशियाने गुरुवारी ब्रिटनच्या राजदूताला बोलावून निषेध व्यक्त केला. रशियाने असा दावा केला आहे की,  क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटवर युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे कर्मचारी सहभागी होते. 

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी अजून याचा निकाल लागलेला नाही. युक्रेनच्या समर्थनार्थ पाश्चात्य देश पुढे आल्याने पुतिन सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, रशियाने गुरुवारी ब्रिटनच्या राजदूताला बोलावून निषेध व्यक्त केला. रशियाने असा दावा केला आहे की, क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटवर युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे कर्मचारी सहभागी होते. राजदूत डेबोराह ब्रोनर्ट स्थानिक वेळेनुसार १०:१० वाजता (०७३० GMT) परराष्ट्र कार्यालयात पोहोचल्या. यावेळी काही लोकांनी ब्रिटीशविरोधी घोषणाही दिल्या आणि त्यांनी'ब्रिटन हा दहशतवादी देश आहे' अशा घोषणांचे फलकही हातात घेतले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार


ब्रिटिश राजदूत ब्रोनर्ट जवळपास ३० मिनिटे मंत्रालयातच होते. तथापि, रशिया किंवा ब्रिटनकडून यावर अद्याप कोणतेही निवेदन करण्यात आलेले नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी बुधवारी सांगितले की, क्रिमियावर शनिवारी झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत राजदूताला बोलावले आहे. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियाला युक्रेनमधून तोडून आपल्या भूभागाशी जोडले होते. मात्र, ब्रिटनने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. रशियाने ब्रिटनला विशेषतः घातक पाश्चात्य शक्ती म्हणून वर्णन केले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, ब्रिटन रशियाचा नाश करण्यासाठी आणि त्यांच्या अफाट नैसर्गिक संसाधनांचा नाश करण्याचा कट रचत आहे.

पाश्चात्य देशांचे रशियावर कठोर निर्बंध–

रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर,ब्रिटन,अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियावर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादले आहेत आणि युद्ध लढण्यासाठी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे.रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेम्हटले आहे की, ब्रिटीश नौदल कर्मचार्‍यांनी नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइन उडवल्या,परंतुइंग्लंडने म्हटले आहे की, युक्रेनमधील रशियन लष्करी अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा दावा करण्यात येत आहे.

 

पुढील बातम्या