मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DollarVsRupee: डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा आपटला; एवढी झाली किंमत, वाचून व्हाल थक्क

DollarVsRupee: डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा आपटला; एवढी झाली किंमत, वाचून व्हाल थक्क

Sep 26, 2022, 06:19 PM IST

    • DollarVsRupee: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे वारंवार कमी होत आहे. रुपया सातत्याने कमजोर होत आहे. सोमवारी देखील ५४ पैशांनी रुपया पुन्हा कोसळला. यामुळे आता १ डॉलर (Dollar) घेण्यासाठी तब्बल ८१. ६३ रुपये मोजावे लागणार आहे. आता पर्यन्तचे रुपयाची सर्वाधिक कोसळलेली किंमत आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा आपटला

DollarVsRupee: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे वारंवार कमी होत आहे. रुपया सातत्याने कमजोर होत आहे. सोमवारी देखील ५४ पैशांनी रुपया पुन्हा कोसळला. यामुळे आता १ डॉलर (Dollar) घेण्यासाठी तब्बल ८१. ६३ रुपये मोजावे लागणार आहे. आता पर्यन्तचे रुपयाची सर्वाधिक कोसळलेली किंमत आहे.

    • DollarVsRupee: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे वारंवार कमी होत आहे. रुपया सातत्याने कमजोर होत आहे. सोमवारी देखील ५४ पैशांनी रुपया पुन्हा कोसळला. यामुळे आता १ डॉलर (Dollar) घेण्यासाठी तब्बल ८१. ६३ रुपये मोजावे लागणार आहे. आता पर्यन्तचे रुपयाची सर्वाधिक कोसळलेली किंमत आहे.

DollarVsRupee: डॉलरच्या तुलनेत रुपया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत आहे. सोमवारी तब्बल ५४ पैशांनी रुपयाचे मूल्य हे पुन्हा कोसळले. यामुळे एका डॉलरची किंमत ही ८१.६३ रुपये एवढी झाली आहे. आतापर्यन्तची रुपयाची ही सर्वाधिक कमी झालेली किंमत मानली जात आहे. सोमवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव हा ८१.४७ झाला. डॉलर गेल्या २० वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक वरच्या स्थरावर पोहचला आहे. तर रुपया हा ऐतिहासिक कोसळला आहे. यामुळे आता भारतीय रिजर्व बँक रुपयांचे अवमूल्यन थांबवण्यासाठी डॉलरची विक्री करू शकते असे बोलले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

काय होणार परिणाम ?

रुपया कमजोर झाल्याने भारताचे आयातीचे बिल वाढेल. यामुळे भारताला आयात करण्यासाठी सर्वाधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. यामुळे आयातीवर अवलंबून असलेल्या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे होणारा तोटा या कंपन्या वस्तूंचे भाव वाढवून कमी करणार आहे. यामुळे महागाई ही पुन्हा वाढणार आहे. पेट्रोलियम उत्पादन, परदेश यात्रा, विदेशातून सर्विस घेणे या सर्व गोष्टी महाग होणार आहे. रुपया कमजोर झाल्याने परिकीय मुद्रेची गंगाजळी ही कमी होणार आहे. यामुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया

०१ जानेवारी ७५.४३

०१ फेब्रुवारी ७४.३९

०१ मार्च ७५.९६

०१ एप्रिल ७६.२१

०१ मे ७६.०९

०१ जून ७७.२१

०१ जुलै ७७.९५

०१ ऑगस्ट ७९.५४

२९ ऑगस्ट ८०.१०

२२ सप्टेंबर ८०.७९

२६ सप्टेंबर ८१.६३

कमजोर रुपयामुळे कुणाची होणार कमाई ?

रुपया कमजोर झाल्याने विदेशात काम करणाऱ्या आयटी कंपन्यांची कमाई वाढवेल. तर फार्मा सेक्टरची निर्यात वाढेल. या सोबतच कापड उद्योगाला याचा फायदा होईल. टेक्सटाइल निर्यातीत भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. कमजोर रुपया या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा पोहचवणार आहे.

 

 

विभाग

पुढील बातम्या