मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lashikar-e Taiba : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला मोठा झटका; सर्वात विश्वासू सहकाऱ्याची हत्या

Lashikar-e Taiba : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला मोठा झटका; सर्वात विश्वासू सहकाऱ्याची हत्या

Oct 02, 2023, 08:22 AM IST

    • Lashikar-e Taiba : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफीज सईदला मोठा धक्का बसला आहे. लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेतील वाद उफाळून आले असून याच वादातून सईदचा जवळच्या सहकाऱ्याची हत्या करण्यात आली.
हाफीज सईद

Lashikar-e Taiba : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफीज सईदला मोठा धक्का बसला आहे. लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेतील वाद उफाळून आले असून याच वादातून सईदचा जवळच्या सहकाऱ्याची हत्या करण्यात आली.

    • Lashikar-e Taiba : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफीज सईदला मोठा धक्का बसला आहे. लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेतील वाद उफाळून आले असून याच वादातून सईदचा जवळच्या सहकाऱ्याची हत्या करण्यात आली.

Lashikar-e Taiba : लष्कर-ए तैयबा या दहशतवादी संघटनेत अंतर्गत वाद उफाळून आला आहे. दहशतवादी हाफीज सईद याचा विश्वासू सहकारी मुफ्ती कैसर फारूख याची गोळ्या झाडून त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केली आहे. या पूर्वी हाफीजच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, पाकिस्तानी मीडियाने फारुखच्या हत्येबाबत मौन बाळगले आहे. तसेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने देखील या घटनेबाबत मौन बाळगले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

फरूख हा सईद याचा खास सहकारी होता. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी पोलिस सूत्रांच्या माहितीने वृत्त दिले आहे. त्याच्यावर काही हल्लेखोरांनी गोलिबाळ केला. यात एक गोळी फारूखच्या पाठीत लागली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एका १० वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झाला.

फारुखच्या हत्येचा व्हिडिओ देखील आला समोर

फारुखच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात काही हल्लेखोर फारूखवर हल्ला करून पळतांना दिसत आहेत.

स्थानिक व्यक्तीने गोळी झाडली

या भागाची संपूर्ण भौगोलिक माहिती असलेल्या दहशतवाद्यांनी फारूखची हत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये स्थानिक लोक सहभागी होऊ शकतात. कारण बाहेरील व्यक्तीने येथे असलेली सुरक्षा भेदून ही हत्या करणे अशक्य आहे.

सप्टेंबर महिन्यात दहशतवादी संघटनांशी संबंधित धार्मिक धर्मगुरूंची मोठ्या प्रमाणात हत्या झाली आहे. या काळात लष्कराच्या कार्यकर्त्यांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले. या हत्यांमुळे लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अपयशी ठरले.

हाफिजच्या मुलाविरुद्ध बंड

लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मुलगा तल्हा याच्या दुसऱ्या कमांडरपदी नियुक्ती केल्याने या विरोधात संघटनेतच मोठा विरोध झाला होता. तल्हा हा लष्कर-ए-तैयबाचा सेकंड इन कमांड म्हणून भारताविरुद्धच्या कारवायांचे नेतृत्व करत होता. २०१९ मध्ये लाहोरमध्ये फ्रीजच्या दुकानाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात तो थोडक्यात बचावला होता. या घडामोडीला लष्करातील अंतर्गत कलह कारणीभूत असून . लष्कराच्या अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी अलीकडेच आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.

आयएसआयच्या तळांमध्ये दहशतवाद्यांना मिळतो आश्रय

अलीकडेच लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आणि प्रमुख मौलवी मोलाना झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर, डझनहून अधिक दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना पाकिस्तानमधील आयएसआयच्या सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये लपवून ठेवण्यात आले आहे. रहमानची कराचीतील गुलिस्तान-ए-जौहरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रेहमानवर पॉइंट ब्लँक रेंजमधून अनेक वेळा गोळ्या घालण्यात आल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. रहमानच्या हत्येने दहशतवादी आणि खलिस्तान कमांडो फोर्सचे प्रमुख परमजीत सिंग पंजवार यांच्या हत्येची आठवण करून दिली. ज्याची मे महिन्यात लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

विभाग

पुढील बातम्या