मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RSS On Pakistan : पाकिस्तानला २० लाख टन गहू पाठवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी

RSS On Pakistan : पाकिस्तानला २० लाख टन गहू पाठवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी

Feb 24, 2023, 04:28 PM IST

    • RSS On Pakistan : शेजारच्या पाकिस्तानात आर्थिक संकट आलेलं असलं तरी तेथील एक कुत्राही उपाशी झोपू नये, अशी आमची इच्छा असल्याचंही संघाच्या नेत्यानं म्हटलं आहे.
Rashtriya Swayamsevak Sangh On Pakistan (HT)

RSS On Pakistan : शेजारच्या पाकिस्तानात आर्थिक संकट आलेलं असलं तरी तेथील एक कुत्राही उपाशी झोपू नये, अशी आमची इच्छा असल्याचंही संघाच्या नेत्यानं म्हटलं आहे.

    • RSS On Pakistan : शेजारच्या पाकिस्तानात आर्थिक संकट आलेलं असलं तरी तेथील एक कुत्राही उपाशी झोपू नये, अशी आमची इच्छा असल्याचंही संघाच्या नेत्यानं म्हटलं आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh On Pakistan : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानवर आर्थिक संकट आलेलं आहे. पाकिस्तानात अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळं आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अमेरिकेकडे आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु आता संकटात सापडलेल्या पाकिस्तानला २० लाख टन गहू पाठवण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केली आहे. त्यामुळं आता त्यांच्या मागणीवरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Attack on Israel : राफाहवर हल्ल्यापूर्वी इस्रायलवर इस्लामिक संघटनेने डागले क्षेपणास्त्र; युद्धाची तीव्रता वाढणार

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

Elon Musk : इलॉन मस्कचा भारतीयांना दणका! ३० दिवसांत १.८५ लाखांहून अधिक 'एक्स' अकाऊंट बंद! 'ही' चूक करणे टाळा

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले की, उपासमारीच्या संकटात सापडेल्या पाकिस्तानला भारत १० ते २० टन गहू पाठवू शकतो. कारण पाकिस्तानात पीठ २५० रुपये प्रतिकिलो झाल्यामुळं वाईट वाटत आहे. त्यामुळं आपण त्यांना गहू, पीठ पाठवू शकतो. परंतु ते मागतच नाहीयेत. ७० वर्षांपूर्वी ते आपल्यासोबतच होते, त्यामुळं त्यांनी सुखी रहावं, अशी आमची इच्छा असल्याचंही संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तानातील दुराव्याचा फायदा काय आहे?, पाकिस्तानातील एकही कुत्रा उपाशी झोपू नये, अशी आमची इच्छा आहे. पाकिस्तान मागत नसला तरी भारतानं त्यांना गहू पाठवायला हवा. पाकिस्तान भारताशी सतत भांडत असतो. आतापर्यंत पाकिस्तानशी चार यु्द्ध झालेली आहेत. आपल्यावर हल्ला करूनही दिवसरात्र पाकिस्तान आपला अपमान करत आहे, परंतु त्यांना संकटकाळात मदत करायला हवी, असंही कृष्ण गोपाल म्हणालेत.

पुढील बातम्या