मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चोरटेही 'जुबां केसरी'वर फिदा; गोदामातील लाखोंच्या 'विमल'वर मारला डल्ला!

चोरटेही 'जुबां केसरी'वर फिदा; गोदामातील लाखोंच्या 'विमल'वर मारला डल्ला!

Aug 06, 2022, 11:59 AM IST

    • Crime News Today : चोरटे काय चोरतील, याचा नेम नाही. गुजरातच्या सूरतमध्ये चोरट्यांनी साडेदहा लाखांचा गुटखा चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News Today In India (HT)

Crime News Today : चोरटे काय चोरतील, याचा नेम नाही. गुजरातच्या सूरतमध्ये चोरट्यांनी साडेदहा लाखांचा गुटखा चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    • Crime News Today : चोरटे काय चोरतील, याचा नेम नाही. गुजरातच्या सूरतमध्ये चोरट्यांनी साडेदहा लाखांचा गुटखा चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crime News Today In India : कोरोना महामारीमुळं लागलेल्या टाळेबंदीत देशातील अनेक ठिकाणी गुटखा चोरीच्या घटना घडल्या होत्या. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये गुटख्यावर बंदी असतानाही सर्रासपणे दुकानांत गुटखा मिळत असतो, परंतु आता ज्या प्रमाणे अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगन हे विमलची जाहिरात 'जुबां केसरी' असल्याचं सांगत असतात, त्यावर फिदा होत चोरट्यांनी लाखो रुपयांचा विमल गुटखा चोरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

मिळालेल्या माहितीनुसार, सूरत शहरातील बारडोलीमध्ये गुटख्याच्या गोदामातून ८ चोरट्यांनी चौकीदाराचं अपहरण करत साडेदहा लाखांचा गुटखा चोरला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारावर आता पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

नेमकं काय झालं?

सूरत शहरातील बारडोलीजवळील जयंबे ट्रेडर्सचं एक गोदाम आहे, या गोदामात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा ठेवण्यात आला होता. त्यामुळं गोदामावर अनेक दिवसांपासून काही चोरटे नजर ठेऊन होते, त्यानंतर पहाटे चार वाजेदरम्यान आठ चोरट्यांनी टोळक्यानं येत चौकीदाराचं अपहरण करून गोदामातील साडेदहा लाखांचा गुटखा चोरून नेला आहे. त्यात विमलच्या ४२ गोण्या आणि २५ मोकळे पाकिट्स होते, चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते पूर्णत: तोडता आलेले नाहीत. सकाळी जेव्हा गोदामाचा मालक तिथं गेला तेव्हा त्याला घडलेला सर्व प्रकार लक्षात आला, त्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोदाम मालकानं दिलेल्या तक्रारीनुसार आता कडोदरा पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करायला सुरुवात केली आहे. सीसीटीव्हीतील व्हिडिओजच्या आधारावर चोरट्यांची ओळख करण्यात येत असून लवकरात लवकर चोरट्यांना अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

विभाग

पुढील बातम्या