मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल.. प्रियंका गांधींना डच्चू, सचिन पायलटांकडे मोठी जबाबदारी, महाराष्ट्राचा प्रभार 'या' नेत्याकडे

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल.. प्रियंका गांधींना डच्चू, सचिन पायलटांकडे मोठी जबाबदारी, महाराष्ट्राचा प्रभार 'या' नेत्याकडे

Dec 23, 2023, 08:48 PM IST

  • Reshuffle In Congress : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठे संघटनात्मक बदल करत प्रियंका गांधी यांना यूपीच्या प्रभारीपदावरून हटवले आहे.

Reshuffle in congress 

Reshuffle In Congress : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठे संघटनात्मक बदल करत प्रियंका गांधी यांना यूपीच्या प्रभारीपदावरून हटवले आहे.

  • Reshuffle In Congress : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठे संघटनात्मक बदल करत प्रियंका गांधी यांना यूपीच्या प्रभारीपदावरून हटवले आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. उत्तर प्रदेशचा प्रभार सांभाळणाऱ्या प्रियंका गांधी यांना हटवून त्यांच्याजागी अविनाश पांडे यांना आणले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अविनाश पांडे यूपीमध्ये काँग्रेसचे प्रभारी असतील. तसेच सचिन पायलट यांच्यावरही काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सचिन पायलट यांना छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

राज्यातील प्रभार बदलांबाबत काँग्रेसने एक यादी जारी केली आहे. या यादीनुसार मुकुल वासनिक यांना गुजरातचा प्रभार देण्यात आला आहे. जितेंद्र सिंह यांच्याकडे आसाम सोबतच मध्य प्रदेशचा अतिरिक्त प्रभार सोपण्यात आला आहे. रणदीप सिंह सुरजेवाला यांना कर्नाटकला पाठवण्यात आले आहे. या यादीनुसार प्रियंका गांधी यांना कोणताही पोर्टफोलियो देण्यात आलेला नाही.

तेलंगणातील विजयानंतर माणिकराव ठाकरे यांच्यावरही गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने जारी केलेल्या नव्या प्रभारींच्या लिस्टनुसार, कुमारी शैलेजा यांना उत्तराखंड, जी.ए. मीर यांना झारखंड तसेच पश्चिम बंगालचा अतिरिक्त प्रभाव सोपवला आहे. दीपक बबरिया दिल्ली सोबतच हरियाणाचा अतिरिक्त प्रभार सोपवला आहे. जयराम रमेश यांच्याकडे संचार, मोहन प्रकाश यांना बिहार, राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि चंडीगड, देवेंद्र यादव यांच्याकडे पंजाबचा प्रभार सोपवला आहे.

पुढील बातम्या