मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Reliance Jio 5G Mobile: सर्वात स्वस्त जिओचा 5G फोन येणार, रिलायन्सची घोषणा; काय असतील फिचर्स?

Reliance Jio 5G Mobile: सर्वात स्वस्त जिओचा 5G फोन येणार, रिलायन्सची घोषणा; काय असतील फिचर्स?

Aug 29, 2022, 03:50 PM IST

    • Reliance Jio 5G Mobile: मुकेश अबांनी यांनी ५जी फोनसाठी रिलायन्स जिओ गूगलसोबत काम करत असल्याचं सांगितलं. रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरांमध्ये सर्वात स्वस्त ५ जी इंटरनेट सेवा देणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितले.
रिलायन्स जिओचा 5G फोन लवकरच बाजारात (फोटो - ब्लूमबर्ग)

Reliance Jio 5G Mobile: मुकेश अबांनी यांनी ५जी फोनसाठी रिलायन्स जिओ गूगलसोबत काम करत असल्याचं सांगितलं. रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरांमध्ये सर्वात स्वस्त ५ जी इंटरनेट सेवा देणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितले.

    • Reliance Jio 5G Mobile: मुकेश अबांनी यांनी ५जी फोनसाठी रिलायन्स जिओ गूगलसोबत काम करत असल्याचं सांगितलं. रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरांमध्ये सर्वात स्वस्त ५ जी इंटरनेट सेवा देणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितले.

Reliance Jio 5G Mobile: रिलायन्स उद्योग समुहाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत रिलायन्सने अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे रिलायन्स जिओ ५जी इंटरनेट सेवा लवकरच सुरू होणार आहे. तसंच देशातील सर्वात स्वस्त ५जी स्मार्ट फोन लाँच करणार असल्याचंही कंपनीने सांगितलं. या स्मार्टफोनसाठी कंपनीने गूगल, क्वालकॉम यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

रिलायन्सने जिओ ५जी फोनची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात फोन बाजारात येण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. मुकेश अबांनी यांनी ५जी फोनसाठी रिलायन्स जिओ गूगलसोबत काम करत असल्याचं सांगितलं. रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरांमध्ये सर्वात स्वस्त ५ जी इंटरनेट सेवा देणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितले. तसंच १०० मिलियन घरांना रिलायन्स जिओशी जोडण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुकेश अंबानी यांनी म्हटले.

जिओचा ५ जी फोन हा सर्वांना परवडेल असा असणार आहे. सध्या बाजारात २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ५ जी फोन उपलब्ध आहेत. त्यामुळे रिलायन्स जिओचा फोन हा १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतो. याची किंमत १२ हजार रुपयांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रिलायन्सने ५जी फोनसाठी क्वालकॉम सोबत पार्टनरशिप केली आहे. याचाच अर्थ ५ जी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट असणार आहे. Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी मिळू शकते. सध्या तरी रिलायन्सकडून फक्त 2 जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटचा मोबाइल लाँच होण्याची शक्यता आहे

जिओ ५जी फोनमध्ये साडे सहा इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय रिअर ड्युअल कॅमेरा सेटअप, प्रायमरी कॅमेरा १३ मेगा पिक्सल असू शकतो. तसंच मॅक्रो सेन्सरचा समावेश असण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या