मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ramlala Viral Photo: अद्भूत मेकअप कला; ९ वर्षाचा हसता-खेळता रामलल्ला!

Ramlala Viral Photo: अद्भूत मेकअप कला; ९ वर्षाचा हसता-खेळता रामलल्ला!

Mar 22, 2024, 07:27 PM IST

  • Ram lala Viral Photo : कपल मेकअप आर्टिस्ट असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या परिसरात रहात असलेल्या एका बालकाला रामलल्लाचे रुप दिले आहे.

राम लल्लाच्या मेकअपमधील ९ वर्षाच्या बालकाचा व्हायरल होत असलेला फोटो

Ram lala Viral Photo : कपल मेकअप आर्टिस्ट असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या परिसरात रहात असलेल्या एका बालकाला रामलल्लाचे रुप दिले आहे.

  • Ram lala Viral Photo : कपल मेकअप आर्टिस्ट असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या परिसरात रहात असलेल्या एका बालकाला रामलल्लाचे रुप दिले आहे.

Ramlala Viral Photo: फोटो पाहून तुम्हाला वाटत असेल की, ही अयोध्येच्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केलेली प्रभू रामलल्लाची मूर्ती असेल. मात्र तुमचा हा भ्रम आहे. हा ९ वर्षाचा एक बालक आहे. त्याला राम लल्लाचे रुप देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील एका जोडप्याने हा मेकअप केला आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे राहणारे हे जोडपे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. कपल मेकअप आर्टिस्ट असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या परिसरात रहात असलेल्या एका बालकाला रामलल्लाचे रुप दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

पश्चिम बंगाल राज्यातील आसनसोल येथे राहणारे आशीष कुंडू आणि रूबी यांनी ९ वर्षाच्या मुलाला मेकअपच्या माध्यमातून अयोध्या राम मंदिरात विराजमान रामलल्ला मूर्तीच्या जीवित अवतारात रुपांतरित केले. आशिष आणि रूबी दोघे मेकअप आर्टिस्ट आहेत व आसनसोलमध्ये एक ब्यूटीपार्लर चालवतात. तसेच रामलल्लाचे रुप घेणारा बालक अबीर आसनसोलमधील मोहिसेला परिसरात राहणारा आहे. 

यावर्षी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन केले होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापणा केली होती. रूबी यांनी यांनी सांगितले की, रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर कुंडू कपल रामल्लाशी संबंधित काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते. रूबी यांनी सांगितले की, त्यांना असे करण्यास जवळपास एक महिन्याचा वेळ लागला. 


कुंडू कपलची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक लोकांना त्यांचे काम पसंद आले आहे तर काही लोकांनी मुलासोबत असे केल्याने ट्रोल केले आहे. हा फोटो १९ मार्च रोजी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ही पोस्ट हजारों लोकांनी पाहिली व शेअर केली आहे. 

एका यूजरने सांगितले की, एका क्षणी असे वाटते की, ही एखादी मूर्ती असेल. दुसरा फोटो पाहिल्यानंतर समजते की, हा एक बालक आहे. तुम्ही देवाच्या नावावर मुलावर अत्याचार का करत आहात? बालक काही प्रमाणात अस्वस्थ दिसत आहे. मात्र अंतिम परिणाम चांगला आहे.  

पुढील बातम्या