मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Priyanka Gandhi: प्रियंका गांधींकडून अमिताभ बच्चन यांनी काढलेला राजीव गांधींचा फोटो पोस्ट

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींकडून अमिताभ बच्चन यांनी काढलेला राजीव गांधींचा फोटो पोस्ट

Aug 20, 2023, 09:55 PM IST

  • Rajiv Gandhi 79th Birth Anniversary: राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.

Priyanka Gandhi

Rajiv Gandhi 79th Birth Anniversary: राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.

  • Rajiv Gandhi 79th Birth Anniversary: राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.

Priyanka Gandhi Instagram Post: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी (२० ऑगस्ट २०२३) रविवारी भारताचे माजी पंतप्रधान आणि त्यांचे वडील राजीव गांधी यांचा त्यांच्या जयंतीनिमित्त एक जुना फोटो शेअर केला. राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्याशी चांगले संबंध असलेले ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी हा क्लिक केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

kozhikode hospital news : बोटाचं ऑपरेशन करायचं होतं, जिभेचं करून टाकलं! सरकारी रुग्णालयात घडला हादरवून टाकणारा प्रकार

प्रियांका यांनी इंस्टाग्रामवर त्याच्या वडिलांच्या मॉन्टेज व्हिडिओसह एक फोटो शेअर केला आहे. प्रियकां यांनी पोस्टमध्ये १९५९ मध्ये आलेल्या 'अनारी' चित्रपटातील 'जीना इसी का नाम है' हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजले. हे गाणे मुकेश यांनी गायले होते, जे राज कपूर आणि नूतन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रियांका यांनी गाण्याच्या ओळी लिहिल्या, "किसी की मुस्कुरातों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उदार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. या ओळी मला नेहमी तुमची आठवण करून देतात. हे गाणे जेव्हा मी ऐकते, तेव्हा माझे डोळे भरून येतात."

फोटोमध्ये राजीव गांधी बॉम्बर जॅकेट घातलेले दिसत आहेत, त्यांच्या गळ्यात डीएसएलआर कॅमेरा लटकलेला आहे. त्यांच्या पाठीमागे जुनी विटांची भिंत आणि गवत दिसत आहे.राजीव गांधी हे १९८४- १९८९ पर्यंत भारताचे सहावे पंतप्रधान होते. २१ मे १९९१ रोजी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमने त्यांची हत्या झाली.

विभाग

पुढील बातम्या