मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gangrape: आठवीतील विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Gangrape: आठवीतील विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Dec 18, 2023, 03:33 PM IST

    • Rajasthan kidnapped and Gangrape: राजास्थानच्या दौसा येथे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.
Rajasthan Gangrape

Rajasthan kidnapped and Gangrape: राजास्थानच्या दौसा येथे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.

    • Rajasthan kidnapped and Gangrape: राजास्थानच्या दौसा येथे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.

Rajasthan Gangrape News: राजस्थानच्या दौसा येथून धक्कादायक माहिती समोर आली. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी परीक्षा देण्यासाठी शाळेत जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली.

ट्रेंडिंग न्यूज

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

Covishield : कोविशिल्डच्या धोक्याबद्दल एस्ट्राझेनकाने २०२१ मध्येच सांगितलं होतं, सीरमने केला खुलासा

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम

Elon Musk : अमेरिकन नागरिकांची भूमिका आलेली २०२४ची शेवटची निवडणूक! एलोन मस्क का म्हणाले असे ? वाचा

लालसोट येथील मंडावरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित मुलगी परीक्षा देण्यासाठी शाळेत जात असताना दोन जणांनी तिचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर पीडतेला मलारना डूंगर येथील पेट्रोल पंपाजवळ सोडून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. पीडित मुलगी दोघांपैकी एका आरोपीला ओळखते. सुरेश मीना (वय, २२) असे पीडिता ओळखत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेत जात असताना मुख्य आरोपी सुरेशने एका साथीदाराच्या मदतीने तिचे अपहरण केले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी शाळेत गेलेली मुलगी रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. यानंतर पीडिता मलारना डूंगर येथील पेट्रोल पंपावर सापडली. यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला.

दरम्यान, पीडिताच्या वक्तव्याच्या आधारे मंडावरी पोलिसांनी दोन जणांविरोधात आयपीसी कलम ३६३, ३७६ आणि ३७६ (ड) आणि पोक्सो काद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

विभाग

पुढील बातम्या