मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime: अपहरण, सामूहिक बलात्कार व नंतर खून; ३ अल्पवयीन मुलांच्या कृत्यानं पोलीसही चक्रावले!

Crime: अपहरण, सामूहिक बलात्कार व नंतर खून; ३ अल्पवयीन मुलांच्या कृत्यानं पोलीसही चक्रावले!

Sep 26, 2023, 05:30 PM IST

  • Rajasthan Crime: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला.

Crime

Rajasthan Crime: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला.

  • Rajasthan Crime: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला.

Rajasthan GangRape And Murder: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील रामगड गावातून सगळ्यांना चक्रावून टाकणारी माहिती उघडकीस आली. एका पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खेळण्याच्या वयात या मुलांनी गुन्हेगारीची पायरी चढल्याने पोलीसही चक्रावून गेले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

संतापजनक.. धावत्या कारमध्ये मुलीवर बलात्कार, जखमी अवस्थेत व फाटक्या कपड्यात पीडिता पोहोचली पोलीस ठाण्यात

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

Covishield : कोविशिल्डच्या धोक्याबद्दल एस्ट्राझेनकाने २०२१ मध्येच सांगितलं होतं, सीरमने केला खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी शनिवारी रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, तिचा कुठेच शोध न लागल्याने कुटुबियांनी रविवारी सकाळी ती बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता ३ आरोपी मुलीच्या घराशेजारी फिरताना दिसले. यामुळे त्यांनीच मुलीचे अपहरण केल्याचा कुटुबियांना संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी तिन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील चौकशीला सुरुवात केली.

दरम्यान, रविवारी गावातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात मुलीवर बलात्कार करून तिची करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी ३ आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली. तिन्ही आरोपींविरोधात आयपीसी कलम ३०२ (हत्या), ३७६ (बलात्कार) ३७६ (ड) (सामूहिक बलात्कार) आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभाग

पुढील बातम्या